जिल्हा वार्ताराजकीय
बुलडाणा जिल्हा कॉग्रेसचे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी घेतली खासदार मुकुल वासनिकांची भेट

कॉग्रेसचे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी घेतली खासदार मुकुल वासनिकांची भेट
संग्रामपुर [प्रतिनिधी ] कॉग्रेस पक्षाच्या बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर प्रकाश पाटील यांनी नागपूर येथे माजी मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, खासदार खासदार मुकुल वासनिक यांच्या नागपुर निवासस्थानी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष प्रकाश अवचार पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रामविजय बुरुंगले, यांनी वासनिक यांची भेट घेतली खासदार वासनिक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता पुन्हा पक्षाला जोडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन कॉग्रेस पक्ष संघटक मजबुत करण्यासाठी जातीने लक्ष द्या अशा सूचना खासदार वासनिकांनी केल्या आहेत.


