बावनबीर नदि पात्रातील पाण्याच्या प्रवाहाला अडथडा ठरणारे अतिक्रमण काढले


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीर गावातील नदीपात्रामध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमण महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात काढले गावातील नदीपात्रातील अतिक्रमण हटविल्याने पाण्या प्रवाह पुर्वरत होऊन नदि काठावरील नागरिकांच्या दुष्टीने सुरक्षित मानला जात आहे सन २०२३ मध्ये आलेल्या महापुराने परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. त्यानंतर नदीपात्रातील अतिक्रमण काढण्याची ओरड होत होती पुराचा धोका लक्षात घेऊन नदि पात्रातील अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली सदर अतिक्रमनावर महसुल विभागाच्या आदेशान्वये गनराज चालवुन नदिपात्र अतिक्रमण मुक्त करण्यात आली अतिक्रमण कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अनुचित प्रकार घडू नये म्हणुन घटना स्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अतिक्रमण मोहिम अप्पर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद महाजन, तामगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे , सोनाळा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे, पोलिस उपनिरीक्षक महादेव खोने, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार राहुल विसावे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली ग्रामस्थांनी सहकार्य केले



