क्रीडाजिल्हा वार्तामहाराष्ट्र

पंचाळा येथील सुवर्णपदक विजेत्या भक्ती खानझोड हिचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार

पंचाळा येथील सुवर्णपदक विजेत्या भक्ती खानझोड हिचे आमदार डॉ संजय कुटे यांच्या हस्ते सत्कार

संग्रामपूर [प्रतिनिधी ] मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ येथे १९ व्या नॅशनल डेजबॉल स्पर्धेत तालुक्यातील पंचाळा येथील भक्ती खानझोड हिने सुवर्णपदक पटकावून संपूर्ण जिल्ह्याचे व परिसराचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकावले आहे. आमदार संजय कुटे यांनी सुवर्ण पदक पटकावणारी भक्ती खानझोड हिचे गुलपुष्प देऊन हिचे सत्कार तिचा गौरव करतांना आ डॉ कुटे म्हणाले की, भक्तीसारख्या होतकरू खेळाडूंमुळे आपल्या भागातील ग्रामीण भागातील युवक-युवतींना निश्चितच नवीन प्रेरणादायी असुन तिची ही जिद्द चिकाटी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे भविष्यात तिला अशाच प्रकारे उत्तमोत्तम यश मिळावे ती जागतिक स्तरावर आपल्या परिसराचे नाव उंचावावी यशाचे शिखर गाठावे म्हणुन प्रोत्साहित केले.
तिच्या या यशाने पंचाळा परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सत्कार प्रसंगी परिसरातील नागरिक, खानझोड पाटील कुटुंबीय, क्रीडाप्रेमी उपस्थित होते सुवर्णपदक विजेत्या भक्ती खानझोड पाटील हिचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!