क्राईमजिल्हा वार्ता

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक आस्वंद येथील राजु मेहेंगे जागीच ठार

 

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक आस्वंद येथील राजु मेहेंगे जागीच ठार

संग्रामपुर [प्रतिनिधी ] शेगाव–वरवट बकाल मार्गावरील भोनगाव फाट्याजवळ भरधाव एका अज्ञात वाहनाने राजु मेंहेगे वय ४५ वर्ष रा आस्वंद यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने राजु मेहेंगे याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार रात्री अंदाजे ११ वाजता घडली
याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि पातुर्डा येथुन जवळ असलेल्या आस्वंद येथील राजू श्रीकृष्ण मेहेंगे वय वर्ष ४५ दि २ जुलै रात्री अंदाजे ११ वाजता हिरो होंडा डबल एस क्र. MH 30 04961 या दुचाकीने शेगाव वरुन पातुर्डा मार्गे आस्वंद ला येत असताना भोनगाव फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आज दि ३ जुलै रोजी स्थानिक स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात पत्नी २ मुले १ मुलगी बराच आप्त परिवार आहे दुदैवी घटनेमुळे मेहेंगे परिवारावर दुखाचे डोंगर कोसळले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!