महाराष्ट्र

मुंबई हुन बेपत्ता विवाहिता ऑपरेशन डिग्निटी नुसार महिलेस तिच्या परिवाराच्या स्वाधीन कर्तव्यदक्ष ए एस आय रंजन तेलंग यांची कामगिरी

मुंबई हुन बेपत्ता विवाहिता ऑपरेशन डिग्निटी नुसार महिलेस तिच्या परिवाराच्या स्वाधीन
ए एस आय रंजन तेलंग यांची कामगिरी

बुलडाणा [प्रतिनिधी ] अवघ्या दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेली मुंबई बदलापूर येथील विवाहिता दि ६ जुलै रोजी तिच्या पती सोबत रात्री दादर येथे फिरायला गेली, नवरा पाणी बॉटल आणायला गेला आणि दादर रेल्वे स्टेशन वरून ही विवाहिता अचानकपणे बेपत्ता झाली,,सगळीकडे फोन सुरू झाले आणि शेवटी दादर रेल्वे पोलिसात तिची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. ७जुलै रोजी तिच्या मोबाईल चे लोकेशन शेगाव आढळून आले, त्यामुळे नातेवाईकांनी रेल्वे हेल्पलाईन १३९ वर कॉल केला, त्यावरून आरपीएफ शेगाव सतर्क झाली आणि एएसआय रंजन तेलंग यांनी सकाळी प्राप्त झालेल्या फोटो वरून रेल्वे स्टेशन शेगाव येथे शोध मोहिम सुरू केली पण ती महिला आढळून आली नाही, पण संध्याकाळी अचानक ती महिला वेटिंग रूम जवळ बसलेली रंजन तेलंग यांना दिसून आली तेलंग यांनी तिला ठाण्यात नेऊन याची सूचना तिच्या परिवारास दिली, त्यावरून तिचे कुटुंब मुंबई वरून शेगाव येथे पोहचले, महिलेस विचारणा केली असता तिने काहीच सांगितले नाही, त्यानंतर एएसआय रंजन तेलंग यांनी दादर पोलिसांना याची माहिती देऊन, सुपुर्दगी नामा बनवून ऑपरेशन डिग्निटी नुसार महिलेस तिच्या परिवारास सुपूर्द केले, गोंधळलेला घाबरलेला परिवार तिच्या भेटण्याने आनंदी झाला आणि त्यांनी एएसआय रंजन तेलंग व आरपीएफ विभागाचे मनापासून आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!