मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत भुमी अभिलेख व महसूल विभागामार्फत पातुर्डा वानखेड शेत रस्त्यांचे सर्वेक्षण मोजणीचे काम सुरु

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजने अंतर्गत भुमी अभिलेख व महसूल विभागामार्फत पातुर्डा वानखेड शेत रस्त्यांचे सर्वेक्षण मोजणीचे काम सुरु
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत तालुक्यातील पातुर्डा वानखेड शिवारातील पांदण शेत रस्ता भूमी अभिलेख तसेच महसूल विभागा यांच्या संयुक्त विदमाने पांदण शेत रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे.तालुक्यातील गाव निहाय शेतात जाऊन रस्त्यांचे मोजमाप, नकाशे तयार करणे आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम महसुल विभाग , भुमि अभिलेख विभाग या दोन्ही विभागाचे अधिकारी कर्मचारी करत आहेत प्रलंबित असलेल्या शेत रस्त्यांच्या प्रश्न सोडविण्यासाठी तहसिलदार प्रशांत पाटील जातीने लक्ष देत असुन व महसुल कर्मचारी , भुमिअभिलेख चे अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने या शेतकऱ्याच्या कल्यानासाठी असलेल्या योजनेमुळे शेतकऱ्यांना खत बी बीयाणे व शेत मशागत शेतमाल ने आण करण्यासाठी सोईचे होईल त्यामुळे शेतकरी स्यर्स्फुर्तिने सहभागी होत असल्याने महसुल भुमिलेख विभाग चे अधिकारी कर्मचारी यांचा काम करण्याचा उत्साह वाढला शेत पाणंद रस्त्याचे सर्वेक्षण मोजमाप चे कामे अंतीम टपप्यात आहे संबंधीत शेत शिवारातील शेत रसत्याची कायापालट शेत माल ने आण करण्यास योग्य होणार असल्याने शेतकरी आनंद व्यक्त असुन प्रशासनाचे आभार मानत आहे यावेळी मंडळ अधिकारी तांबेरे ,सायली पाटील,भूमापक ,साक्षी शाई वाले,स्वप्नील मुंडले, महसुल अधिकारी चव्हाण , लिढे व शेतकरी उपस्थित होते



