हुंड्यासाठी मानसीक शाररिक छड करुन आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पती सह चौघा विरुद्ध तामगाव पोस्टेला गुन्हा दाखल
हुंड्यासाठी मानसीक शाररिक छड करुन आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी चौघा विरुद्ध तामगाव पोस्टेला गुन्हा दाखल
संग्रामपुर [प्रतिनिधी ] शेगाव येथील माहेर तर संग्रामपुर सासर असलेल्या २३ वर्षीय सायमा फिरदोस शेख फिरोज महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना संग्रामपुरात घडली या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि २३ वर्षीय सायमा फिरदोस यास आरोपीतांनी संगणमत करून नमुद मृतक हिस वेळोवेळी हुंडयाची मागणी करून आणि शारिरीक व मानसिक त्रास देवुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. तामगांव पोस्टे मृतक महिलेच्या नातेवाईक फिर्यादी शेख लुकमान शेख सुलेमान वय- 54 वर्ष रा. सीतामाता मंदिराजवळ शेगाव यांचे फिर्यादी तोंडी तक्रारी वरून आरोपी शेख फिरोज शेख शरीफ , शेख शरीफ शेख मनु, शेख फरजाना बी शेख शरीफ,शेख शाहरुख शेख शरीफ सर्व रा संग्रामपुर याच्या विरुद्ध
तामगांव पोस्टेला कलम 108, 80, 3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तामगाव पोस्टेचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनात पुढील तपास पोउपनि विलास बोपटे करित आहे

