शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली तर ठिक अन्यथा सत्ताधाऱ्यांची दिवाळी साजरी होऊ देणार नाही विठ्ठल पाटील वखारे

संग्रामपुर [प्रतिनिधी ] राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अवकाळी पाऊस, दुष्काळ स्थितीत तोकड्या मदत असुन शेतकऱ्याची क्रुर थट्टा नव्हे का ? कारण त्यात पीकविमा मिळणे दुरापास्त झाले आहे. खते, बियाणे आणि मजुरीचा वाढता खर्च भागवणे शेतकऱ्यांना अशक्य होत आहे कृषि प्रधान देशात शेतकऱ्याची चेष्ठा शेतकरी विरोधी शासनाचा निषेध करत संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे यांनी जर दिवाळीपूर्वी शेतकरीना आर्थिक मदत मिळाली नाही, तर मंत्र्यांची दिवाळी साजरी होऊ दिली जाणार नाही.शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती, शेतीमालाला योग्य हमीभाव नुकसानीची ठोस भरपाई हवी द्या अन्यथा शेतकरी शासनकर्त्याना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही असा इशारा विठ्ठल वखारे यांनी दिला आहे.


