जिल्हा वार्ता

संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचाच्या संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी आरोग्यदूत राजेश चोरे यांची नियुक्ती

संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचाच्या संग्रामपूर तालुकाध्यक्षपदी आरोग्यदूत राजेश चोरे यांची नियुक्ती

संग्रामपूर [प्रतिनिधी] तालुक्यात सामाजिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आरोग्यदूत राजेश चोरे यांची श्री संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. समाजहिताची भावना जोपासत विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य जनजागृती, युवक संघटन समाजप्रबोधनाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मंचाचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर रामराव सरदार यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे.या नियुक्तीमुळे संग्रामपूर तालुक्यात कुणबी युवा मंचाचे कार्य व युवकांना संघटित करून समाजहिताचे विविध उपक्रम राबविण्यास अधिक गती मिळेल, असा विश्वास समाजबांधवांनी व्यक्त केला आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरावरुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!