महाराष्ट्रशिक्षण
ब्रह्मज्ञानाच्या शिकवणी जीवनात उतरवणे हीच जागृती निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा महाराज

संग्रामपुर [प्रतिनिधी ] “ब्रह्मज्ञानाची खरी सार्थकता ते जीवनात अंगीकारण्यात आणि आपल्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये आणि कर्मांमध्ये समाविष्ट करण्यात आहे.” हे दिव्य भाव सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी ७९ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समारोप दिवशी शेगांव, बुलढाणा जिल्ह्यासह देश-विदेशातील लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रद्धाळूंना आपल्या पावन आशीर्वचनांद्वारे प्रदान केले.जागृती’ च्या आध्यात्मिक प्रेरणांना आपल्या जीवनात आत्मसात करून स्वतःच्या उत्थानाबरोबरच जगाच्या कल्याणाची भावना दृढ करणारा हा पावन संत समागम काल रात्री प्रेमभक्ती आणि श्रद्धेने ओतप्रोत वातावरणात संपन्न झाला. समागमातून आध्यात्मिक प्रेरणा आणि गोड आठवणी घेऊन श्रद्धाळू भक्त हळूहळू आपापल्या गंतव्यस्थानाकडे प्रस्थान करू लागले.सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांनी विशाल मानव परिवाराला संबोधित करताना आपल्या पावन प्रवचनात सांगितले की ‘जागृती’ केवळ सत्संग किंवा समागमापुरती मर्यादित नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षणी निराकार परमात्म्याच्या जाणीवेने जगण्याचे नाव आहे. ब्रह्मज्ञानाची खरी सार्थकता तेव्हाच आहे, जेव्हा आपण ते आपल्या विचारांमध्ये, वागणुकीमध्ये आणि कर्मांमध्ये अंगीकारतो.सद्गुरू माता जी यांनी सकारात्मक विचार, प्रेम, करुणा आणि नम्रता अंगीकारण्याची तसेच दुसऱ्यांच्या उणीवांऐवजी त्यांच्या चांगल्या गुणांकडे पाहण्याची प्रेरणा दिली. खरी जागृतीची सुरुवात आपल्या घर-परिवारापासून आणि वैयक्तिक जीवनापासून होते. सेवा, सुमिरन आणि सत्संग यांना जीवनाचा अविभाज्य भाग मानून प्रत्येक परिस्थितीत परमात्म्याची जाणीव टिकवून ठेवणेच जीवनाला सुखमय आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध बनवते.या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी सद्गुरू माता जी आणि निरंकारी राजपिता जी यांचे पावन दर्शन घेऊन त्यांच्या दिव्य आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, सर्व साध-संगत आणि समागमाच्या यशस्वी आयोजनात सहकार्य देणाऱ्या सर्व सरकारी विभागांचे मनापासून आभार मानले. त्यांनी या वर्षी समागमात मागील वर्षांच्या तुलनेत अधिक संख्येने श्रद्धाळू सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि भविष्यातही संगतच्या संख्येत सतत वाढ होण्याची मंगलकामना केली.
कवी दरबार
या वर्षी समागमाच्या चारही दिवस आयोजित केलेल्या कवी दरबारात बालकवींसह महिला आणि पुरुष कवींनी उत्साहाने भाग घेतला जो आकर्षणाचा एक मुख्य बिंदू ठरला. या प्रसंगी ८० कवींनी ‘जागृती’ विषयावर आधारित आपल्या स्वरचित कविता हिंदी, राजस्थानी, पंजाबी, इंग्रजी, हरियाणवी, मुलतानी, मराठी, भोजपुरी आणि संस्कृतसह विविध भाषांमध्ये सादर केल्या. या भावपूर्ण काव्य सादरीकरणांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि सर्वांनी या आयोजनाचा भरपूर आनंद घेतला.अशा प्रकारे, ७९ वा वार्षिक निरंकारी संत समागम सद्गुरूंचा दिव्य संदेश, प्रेम, भक्ती आणि मानवतेच्या भावांनी ओतप्रोत वातावरणात संपन्न झाला. नि:संदेह, हा पावन संत समागम आध्यात्मिक जागृती आणि सद्भावाचा अनुपम संगम ठरला, ज्याने अनेकतेत एकता आणि संपूर्ण मानवतेला एका सूत्रात बांधण्याचा दिव्य संदेश दिला. अशी माहिती प्रभारी प्रेस मीडिया शिवहरी महादेव वानरे यांनी दिली



