महाराष्ट्र

अकोट येथे राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्या संदर्भात संग्रामपुरात पुर्वनियोजीत बैठक समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन

 

संग्रामपूर [प्रतिनिधी] अकोट येथे राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्या संदर्भात संग्रामपुरात पुर्वनियोजीत बैठक तालुक्यातील धनगर समाज बांधवांची बैठक कॉटन मार्केट, वरवट बकाल येथील हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर समाज सेवा समिती, अकोट-तेल्हारा यांच्या विद्यमाने रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२६ रोजी अकोट येथे आयोजित राज्यस्तरीय धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली समितीचे संस्थापक अध्यक्ष काशीराम साबळे यांच्या सह समाज बांधवाच्या सहकार्याने ६ डिसेंबर २०२६ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कॉलनी अकोट वधू वर परिचय मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून विवाहयोग्य मुला-मुलींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.मेळाव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाजातील पालकांनी आपल्या विवाहयोग्य मुला-मुलींची माहिती संकलित करून संपर्क समितीमार्फत आयोजन समितीकडे दि. २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष काशीराम साबळे यांनी केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन मेळावा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी अनिल सुलताने, गजानन मालठाणे, गजानन दामोदर, श्रीकृष्ण वैतकार शिवा बाहे, प्रकाश उभे संजय बोरसे ,नाजुकराव घाटोळ, नंदू पुंडे ,योगेश बाजोळ, राजेंद्र परमाळे, आकाश श्रीकृष्ण बोरसे, शांताराम घुले आदी समाज बांधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!