जिल्हा वार्ता

उद्या सखारामपुर येथे मराठा पाटिल वधू-वर परिचय मेळाव्यास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे संजय वाकळे पाटिल

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी] सखारामपुर येथे उद्या दि१५ नोव्हेंबर रोजी मराठा पाटील वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन तुकाराम महाराज यांच्या अध्यक्षते खाली करण्यात आले असुन मराठा पाटील सेवा समितीच्या वतीने आयोजीत वधू वर परिचय मेळावा मागचा उद्देश समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींसाठी एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या परिचयातून योग्य विवाहसंबंध जुळविणे होय
आजच्या धावपळीच्या जीवनात विवाहयोग्य मुला-मुलींसाठी योग्य जोडीदार शोधणे ही पालकांसमोरील महत्त्वाची जबाबदारी बनली आहे. ही गरज लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेला हा मेळावा समाजासाठी स्तृत्य उपक्रम आहे या माध्यमातून विवाहयोग्य युवक-युवतींना एकमेकांचा परिचय करून घेण्याची पालकांना योग्य स्थळांची माहिती मिळविण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झाली
तरी समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक-युवती, पालक व समाजबांधवांनी काळाची गरज लक्षात घेऊन आपल्या कुटुंबीयांसह समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मराठा पाटिल सेवा समितीच्या वतीने तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थाचे संचालक संजय वाकळे पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!