क्राईमजिल्हा वार्ता

सावळा फाटा निवाना येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार मायलेक गंभीर जखमी मृतक संभाजीनगर येथील भाऊ बीज निमित्त तेल्हारा जातांना अपघात 

सावळा फाटा निवाना येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पती ठार मायलेक गंभीर जखमी
मृतक संभाजीनगर येथील भाऊ बीज निमित्त तेल्हारा जातांना अपघात

संग्रामपूर [प्रतिनिधी ]  संग्रामपुर जळगाव रोडवर  सावळा फाटा निवाना येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडक झालेल्या भीषण अपघातात पती ठार तर पत्नी व मुलगी गंभीर जखमीं झाल्याची घटना सायंकाळी ६ वाजता घडली मृतक व्यक्ती संभाजीनगर येथील रहिवासी असुन मृतकाचे नाव नरेश श्रीनाथ अंदाजे वय ४५ आहे या बाबत थोडक्यात प्राप्त माहिती असे प्रकारे आहे कि संभाजीनगर येथील ४५ वर्षीय  नरेश श्रीनाथ हे ॲकटीवा दुचाकी  पत्नी व मुली सह  जळगाव संग्रामपुर रोडने तेल्हारा कडे जात असतांना सावळा निवाना फाट्या जवळ अज्ञात वाहनाने  ॲकटीवा जबर धडक दिली झालेल्या अपघातात पती नरेश श्रीनाथ  ठार तर कृष्णा नरेश श्रीनाथ (आई ) वैष्णवी मुलगी या दोघमा यलेक गंभीर जखमी झाले ॲम्बुलन्स ने वरवट ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन गंभीर जखमी मायलेक याच्या वर प्राथमिक उपचार केल्या नंतर गंभीर अवस्थेत दोघा मायलेकीन  शेगांव येथे रेफर करण्यात आले पती पत्नी एक मुलगी स्कुटी ( ॲक्टीवा

) संभाजीनगर येथुन जळगाव संग्रामपुर मार्गे  तेल्हारा येथे दिवाळी भाऊ बीज साठी जात होते मृतकाचे नातेवाईक तामगाव पोस्टेला तक्रार देण्या साठी दाखल झाले होते वृत लिहे पर्यंत तामगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!