देशब्रेकिंग न्यूजराजकीय

शिवसेनेच्या जनसंवाद कार्यालयातून मेहकरचा विकास साधा – माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

शेतकऱ्यांची कर्जमाफी तातडीने व्हावी; महाविकास आघाडी रस्त्यावर उतरायला तयार – शिंगणे

मेहकर (प्रतिनिधी) :- शिवसेनेच्या जनसंवाद कार्यालयाच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघाचा विकासाचा बॅकलॉग भरून निघावा. या कार्यालयातून लोकांच्या तक्रारींना न्याय मिळाला पाहिजे, हीच खरी जनसेवा आहे,” असं प्रतिपादन माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलं. या वेळी विचारपीठावर संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर,जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, अँड जयश्री शेळके, काँग्रेस राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण घुमरे, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, सहसंपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, उपजिल्हा प्रमुख प्रा आशिष रहाटे, ॲड अनंत वानखेडे, कलीम खान,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विजयाताई खडसान, नंदू बोरे, विजय मोरे, तेजराव घायाळ,राजू बुधवत, सतीश ताजने, दत्ता पाटील घनवट, विलास चनखोरे दिलीप वाघ, किशोर भाऊ गारोळे, प्रदीपबापू देशमुख, माधुरी पवार,ॲड आकाश घोडे ,

नारायण बळी, संजय वडतकर, जीवन घायाळ, पंकज हजारी, शेख समद, डॉ नंदकिशोर देशमुख, भास्कर ठाकरे, सिद्धेश्र्वर आंधळे,विजय मोरे, आरती देशमुख, तारामती जायभाये, स्वाती नवले, नगमा गवळी, पौर्णिमा गवई,आरती दीक्षित, संजीवनी वाघ, अमोल बोरे, श्याम पाटील,रहीम कुरेशी, निसार अन्सारी,गजानन मोरे, ॲड संदीप गवई,गोपाळ गायकवाड,अशोक तुपकर, विश्वनाथ बाहेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी तर आभार आमदार सिद्धार्थ खरात यांनी मानले मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाचे उद्घाटन आज डॉ. शिंगणे यांच्या हस्ते झाले. या वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढवला.

लोकांच्या समस्या ऐका, तोच खरा संवाद

माजी मंत्री डॉ. शिंगणे म्हणाले


या कार्यालयात बसणाऱ्या प्रत्येकाने ऐकून घेण्याची क्षमता ठेवावी. नागरिक जेव्हा आपल्या समस्या घेऊन येतात, तेव्हा त्यांचं निवेदन वाचलं, प्रतिसाद दिला — एवढ्यानं त्यांना अर्धं समाधान मिळतं. जनतेशी संवाद म्हणजे केवळ बोलणं नव्हे, तर ऐकणं आणि कृती करणं आहे. ते पुढे म्हणाले,
मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या कार्याची मी गॅरंटी प्रचाराच्या पहिल्याच दिवशी घेतली होती, आणि आज त्यांच्या कामातून ती गॅरंटी योग्य ठरते आहे. हे कार्यालय म्हणजे जनतेसाठी एक विश्वासाचं केंद्र आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे – सरकार टाळाटाळ करतेय

माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले,
शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे; ही वेळ आता आली आहे. पण राज्यातील सत्ताधारी सरकार यावर टाळाटाळ करत आहे. शेतकरी आज उद्ध्वस्त झाला आहे, दिवाळी साजरी करावी की नाही, याचंही उत्तर त्याच्याकडे नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागेल.ते म्हणाले,महाविकास आघाडी एकत्र आली, तर शेतकऱ्यांचे आणि सामान्य जनतेचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. सरकारने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणे थांबवावे.

    आमदार सिद्धार्थ खरात यांचा सरकारवर संतप्त हल्ला

या प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर थेट निशाणा साधला.
ते म्हणाले,हे सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं. सातबारा कोरा करू, आत्महत्या शून्यावर आणू म्हणणारे आज कोऱ्या आश्वासनांवर आहेत. मेहकर आणि लोणार तालुके अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाले असूनही शासनाच्या यादीतून वगळले गेले. हा जनतेशी अन्याय आहे. आमदार खरात यांनी मुख्यमंत्री आणि शासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला –
“मंगळवारपर्यंत जर निर्णय झाला नाही, तर मेहकरची जनता रस्त्यावर उतरेल! मेहकरपासून परिवर्तनाची सुरुवात डॉ. शिंगणे यांनी शेवटी आवाहन केले,
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र राहा. महाविकास आघाडीची ताकद लोकांच्या हितासाठी वापरली पाहिजे. मेहकर पासून सुरू होणारा परिवर्तनाचा प्रवास जिल्ह्यातून राज्यभर पोहोचेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!