कांतीगुरु विचार मंच प्रांत व जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

लोणार (प्रतिनिधी) :- क्रांतीगुरु लहुजी विचार मंच सामाजिक संघटनेच्या महत्त्वपूर्ण सभेची बैठक आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनात व अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नेते संतरामजी तायडे यांच्या अध्यक्षतेत सदर बैठकीचे १२ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते.या महत्त्वपूर्ण बैठकीस ज्ञानदेवराव मानवतकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. या प्रसंगी संघटनेच्या पुढील वाटचालीची रुपरेषा ठरविण्यात आली. संघटनेतर्फे मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासा बाबत संघटनेच्या माध्यमातून शिव ,लहू ,फुले, शाहू ,आंबेडकर अण्णाभाऊ या महामानवाच्या विचारधारेला अनुसरुन विविध उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने सदर संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संघटनात्मक कार्याला गती यावी म्हणून संघटनेचा विस्तार करण्यात येत आहे. काही दिवसातच विविध उपक्रम संघटने मार्फत राबवण्यात येणार आहे. त्याकरिता क्रांतीगुरु लहुजी विचार मंच संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा केली.सदर बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर शैक्षणिक चळवळ राबविण्यात येणार आहे. सोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये नवयुवकांना आणण्याच्या दृष्टीने ही संघटना काम करणार आहे. असे मनोगत संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पुढे बोलताना ते म्हणाले की, आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकां मध्ये मातंग समाजाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संघटनेची आग्रही भूमिका असणार आहे. पत्रकार परिषदेच्या पूर्वी झालेल्या बैठकीत पुढील प्रमाणे कार्यकारणीत पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.यात राज्य सरचिटणीस वामनराव गुढेकर,राज्य संघटक महादेवराव अडायके ,
विदर्भ प्रदेशाध्यक्ष चंद्रभानजी पोळकर(वाशिम),
विदर्भ प्रदेशउपाध्यक्ष गणेशराव यंगड, विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रतिककुमार शिंदे (अमरावती), विदर्भ प्रदेश सचिव दत्तात्रय बोरकर, विदर्भ प्रदेश संघटक
गजाननराव सोनोने, विदर्भ प्रदेश सल्लागार
नामदेवराव जाधव , जिल्हाध्यक्ष बुलढाणा (उत्तर) प्रल्हादराव कांबळे नांदूरा,अध्यक्ष बुलढाणा जिल्हा (दक्षिण)मदनराव रत्नपारखी कार्याध्यक्ष उत्तमराव बाजड , जिल्हाध्यक्ष युवाघाडी (उत्तर)कृष्णा नाटेकर ,अध्यक्ष बुलढाणा जिल्हायुवा आघाडी( दक्षिण)मणिष पाटोळे, सरचिटणीस विदर्भ प्रदेश श्रीमती रमाबाई नाडे,महिला आघाडी जि.अध्यक्ष सौ. दुर्गाबाई श्रावण अडाळे (जळगाव जामोद), जिल्हा उपाध्यक्ष उमेश बाभुळकर, विदर्भ प्रदेश सह संघटक मदन नेमाडे तालुका अध्यक्ष लोणार भगवानराव आवारे सह पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड पुढच्या बैठकीमध्ये करण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी सांगितले. यावेळी श्रीरामजी बाजड, अनिल पाटोळे, किसन बाजड, राजू घाटोळे, किशोर बाजड, दीपक बाजड, विजय तोडे, मुकेश अवसरमोल सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


