जिकडे – तिकडे महाविकास आघाडीचीच प्रचंड लाट !
चिखलीकरांना भीती आणि सूडाच्या चक्रातून बाहेर काढणार : राहुलभाऊ बोंद्रे

चिखली प्रतिनिधी : – चिखलीकरांनो, तुम्हाला सूडाचे आणि दहशतीचे राजकारण पुढे चालू ठेवायचे आहे, की शांतता, विकास आणि सन्मानाचे नवे पर्व सुरू करायचे आहे? असा सवाल करत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी भय आणि भ्रष्टाचार मुक्त चिखली करण्याचा निर्धार व्यक्त केला. महाविकास आघाडी चिखली शहराचा सर्वांगीण विकास करेल
त्याच बरोबर चांगला आणि भयमुक्त नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार परत मिळवून देईल.चिखलीला या भीती आणि सूडाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी, या लोकशाही विरोधी राजकारणाचा अंत करण्यासाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे व महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनाला मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.
चिखलीत प्रभाग 13 मध्ये आमदार सिद्धार्थजी खरात व ज्येष्ठ नेते नरुभाऊ खेडेकर, संदेशजी आंबेडकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या उपस्थितीत कॉर्नर मीटिंग उत्साहात पार पडली. परिसरातील नागरिकांचा वाढता पाठिंबा हा महाविकास आघाडीवरील वाढत्या विश्वासाला अधोरेखित करतो. या बैठकीत प्रभागातील अधिकृत उमेदवार सौ. रजनी निखिल जागृत आणि आनंद गैची
यांनी आपल्या विकासनिष्ठ भूमिकेची स्पष्ट मांडणी करून मतदारांशी थेट संवाद साधला.
चिखलीकरांना मविआ सन्मान आणि सुरक्षितता देईल : प्रा. नरेंद्र खेडेकर
सामान्य नागरिक, व्यापारी आणि कष्टकरी जनतेला सन्मानाने जगता येईल, अशी शांत आणि सुरक्षित प्रशासकीय व्यवस्था चिखलीत महाविकास आघाडी निर्माण करणार आहे.महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली विकास, पारदर्शकता आणि जनता प्रथम या ध्येयाने पुढे जात आहे. नागरिकांनी उपस्थित राहून दाखवलेला विश्वास निवडणुकीतील मोठ्या विजयाची खात्री देणारा असल्याचे उबाठा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांनी सांगितले.
काशिनाथ आप्पा नगरपालिकेत लोकशाहीचे दर्शन घडवतील : आमदार सिद्धार्थ खरात
महाविकास आघाडीच्या भव्य सभेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्याबद्दल जोरदार विश्वास व्यक्त केला.
काशिनाथ आप्पा नगरपालिकेत लोकशाहीचे खरे दर्शन घडवतील. दडपशाही, दादागिरी आणि दबावमुक्त प्रशासन चिखलीला देण्याची ताकद त्यांच्यात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.



