जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतुन मिशन परिवर्तन अंतर्गत पोलीस भरती सराव लेखी परिक्षेला उत्तम प्रतिसाद २५० परिक्षार्थीनी दिली पोलीस भरती परिक्षा

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील टुंनकी येथे आदिवासी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयच्या प्रांगणात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतुन मिशन परिवर्तन अंतर्गत सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांच्या पुढाकाराने व पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने आदिवासी बहुल तालुक्यातील गृहविभाग पोलीस खात्यात भरती होण्यासाठी ईच्छा बाळगुन असलेल्या १६० युवक व ५०युवतींनी पोलीस भरती सराव लेखी परिक्षा दिली प्रथम , व्दितीत, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या परिक्षार्थीला सोनाळा पोस्टेच्या वतीने विशेष आकर्षक बक्षिस देण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आल्याने पोलीस होण्याची मनिषा बाळगणाऱ्या युवक युवती उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला
सोनाळा पोस्टेच्या वतीने टुनकी येथील आदिवासी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजीत पोलीस भरती लेखी सराव परिक्षा संदर्भात परिक्षार्थी युवक युवतींना ठाणेदार संदिप काळे यांनी पोलीस खात्यात भरती पुर्व करायची तयारी बाबत विस्तृत मार्गदर्शन केले तसेच पोलीस भरती लेखी सराव परिक्षेची तयारी यावर मार्गदर्शन करून प्रथम व्दितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या भावी पोलीस परिक्षार्थीना विशेष पारोतोषिक देण्याची घोषणा केली जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतुन मिशन परिर्वतन अंतर्गत सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांच्या मार्गदर्शनात पुढाकाराने आदिवासी विद्यालय प्रांगणात पोलीस भरती लेखी परिक्षा सराव मुले व मुली २१० परिक्षार्थीनी परिक्षा दिली यावेळी पो कॉ तितरे , खुफिया विभागाचे शिंमरे , पोलीस जमादार विशाल गवई , पवार , आदि पोलीस कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले आहे



