पी एम श्री जिल्हा परिषद पातुर्डा बु च्या कबड्डी खेळाडू सागर तायडे याची राज्यस्तरावर निवड


संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा बु पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कुल च्या १७ वय गटाच्या आतील दोन विद्यार्थी सागर गजानन तायडे व धनंजय विलास खंडेराव यांची निवड चाचणी साठी मुर्तुजापुर येथे अमरावती विभागीय कबड्डी सामने संपन्न झाले त्यात सागर गजानन तायडे याने उत्कुष्ठ खेळून चमकदार कामगीरी केली राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी समिती पदाधिकाऱ्यांच्या निकषात बसल्याने राज्यस्तरीय पात्र यादीत स्थान मिळविले १७ वय गटाच्या आत सागर तायडे या कबड्डी खेळाडूची अमरावती विभागातुन बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधि करण्यासाठी राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीत निवड झाली सागर तायडे याने कबड्डी खेळात कोच शिक्षक सचिन सुरेड कराड यांच्या मार्गदर्शनात यश संपादन करुन पातुर्डा गावा सह मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयाचे नाव उचावले आहे सागर तायडे याची अमरावती विभागातुन राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणी साठी निवड झाल्या बद्दल पी एम श्री जि प हा चे प्राचार्य रामप्रसाद मावस्कर , पर्यवेक्षक प्रा नितीन पाटील , शाळा समिती अध्यक्ष विष्णु भोंगळ , अलीयार खान ,सर्व शिक्षक वृंद यांनी गुलपुष्प देऊन कौतुक केले कबड्डी खेळाडू सागर तायडे याची राज्यस्तरीय निवड चाचणी मध्ये निवड झाल्या बद्दल त्याचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे
👉बॉक्स👈
कबड्डी खेळाडू सागर तायडे बुलडाणा जिल्ह्यातुन सागर तायडे राज्यस्तरावर एकमेव निवड
तालुक्यातील पातुर्डा येथील मजुर गरिब कुटुंबात जन्मलेला सागर हा लहान पणा पासुनच कबड्डी खेळाची आवड त्यात जिद्दी मेहनत व त्याचे कोच शिक्षक सचिन कराड यांनी केलेले वेळोवेळी प्रोत्सान मार्गदशन यातुन संधीचे सोने करून सागर तायडे यांने ग्रामीण भागात शालेय कबड्डी खेळात नावलौकीक मिळविले अमरावती विभागातुन बुलडाणा जिल्ह्यातुन ग्रामीण भागातुन राज्यस्तरावर निवड चाचणी साठी एकमेव कबड्डी खेळाडू पात्र ठरला हे मात्र विशेष



