स्व. रामरावजी झनक फार्मसी कॉलेज येथे ‘रक्तगट’ तपासणी शिबीर…
रक्तगट' तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद...

केनवड:- येथे दि. 1२ डिसेंबर रोजी स्व. रामरावजी झनक कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च सेंटर येथे रक्तगट तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक ‘गुरुकृपा कॉम्प्युटराईस क्लीनिकल पॅथॉलॉजीच्या वतीने स्वर्गीय रामराव जनक फार्मसी कॉलेज येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपल्या ‘रक्ताचा गट’ तपासला.
प्रा. महेश जुनघरे सर यांच्या मदतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते, यावेळी गुरुकृपा पॅथॉलॉजी चे संचालक गणेश पळसकर तसेच टीमने तपासणी केली. या उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या रक्तगटाची माहिती मिळाली, असे मत सहभागीं विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.तसेच हे शिबीर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रा.लक्ष्मण जुनघरे प्रा.महेश जुनघरे प्रा.आकाश बोरकर प्रा.योगेश जुनघरे प्रा.ज्ञानेश्वर बाजड यांनी परिश्रम घेतले.



