शिक्षण
कथा श्रवणाने जीवन जगण्याची कला अवगत होते हभप गजानन दहीकर महाराज वरवट बकाल येथे महाशिवपुराण कथेला सुरुवात

संग्रामपूर [प्रतिनिधी ] शिवपुराण ही भगवान शिवाच्या लीला, महिमा आणि भक्तीवर आधारित १८ पुराणांपैकी एक महत्त्वाची महापुराण आहे, ज्यात शिवलिंगाची उत्पत्ती, पार्वती विवाह आणि शिव-पार्वतीच्या अनेक कथांचा समावेश आहे यात १ लाख श्लोक असल्याचे मानले जाते.सालाबाद प्रमाणे तालुक्यातील वरवट बकाल ग्रामस्थ यांच्या वतीने लिंगेश्वर मंदिराच्या परिसरात संगीतमय महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले सदर कथेचे वाचन हभप गजानन महाराज दहीकर महाराज यांच्या मधुर वाणीतून होत आहे दि.२३ रोजी कथेला प्रारंभ झाला असून सदर कथा ही दि ३० ला महाप्रसादाचे सांगता होणार सदर कथा आयोजित करण्यात आली आहे सप्ताह भर गावात भक्तीमय वातावरणात निर्माण होत असून या भक्तीमय वातावरणात कथेला सुर्वात झाली असून दररोज सकाळी काकडा आरती दुपारी शिवपुराण सायंकाळी हरीपाठ व रात्री विविध कीर्तन. प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हभप गजानन महाराज दहीकर यानी आज कथेत उपस्थितांना कथा वाचनातून सांगितले की शिवपुराणाचे पठण केल्याने पापे नष्ट होतात आणि पुण्य मिळते, अशी मान्यता आहे
शिवाचे सानिध्य हे पुराण वाचल्याने भगवान शिवाच्या रूपाचे, गुणांचे आणि तत्त्वज्ञानाचे सखोल ज्ञान मिळते नित्य पठणाने मनाला एकाग्रता, आंतरिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती मिळून मोक्षप्राप्ती होऊ शकते
शिवपुराण कोनीही वाचू शकते, कारण यात शिवभक्ती आणि नैतिक धडे दिले आहेत माणसाने आयुष्यात किमान एकदा तरी शिवपुराणाचे वाचन अवश्य करावे. त्यातून जीवन जगण्याची कला अवगत होते, असे प्रतिपादन हभप गजानन महाराज दहीकर यांनी केले.वरवट बकाल येथील लिंगेश्वर मंदिराच्या परिसरात संगीतमय महाशिवपुराण कथा ही लिंगेश्वर मंदिर परिसरात सुरू झाली असून गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे



