जिल्हा वार्ताशासकीय

एसएमएस स्पर्श प्रणाली रद्द करून घरकुल लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते नियमित व वेळेत द्या सरपंचा सिमा वानखडे यांची मांगणी गटविकास अधिकारी यांना निवेदन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते मिळण्यास सध्या मोठ्या प्रमाणात विलंब होत असून त्यामुळे लाभार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एसएमएस स्पर्श प्रणाली रद्द करून घरकुल लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते नियमित व वेळेत द्या अशी मांगणी टुनकी सरपंचा प्रशासक सिमा राजेन्द्र वानखडे यांनी गटविकास अधिकारी माधव पायघन यांच्या कडे एका निवेदन व्दारे केली आहे
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि
घरकुलाची फाईल तयार करणे, जिओ-टॅगिंग करणे, एफटीओ प्रक्रिया पूर्ण करणे यासाठी आधीच बराच कालावधी लागतो. त्यात शासनाने लागू केलेल्या एसएमएस स्पर्श प्रणालीमुळे अनुदान वितरणास आणखी विलंब होत आहे. या प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना हप्ता मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होण्यासाठी सुमारे ४५ दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी पहिला हप्ता मिळाल्यानंतर दुसरा हप्ता मिळण्यासाठी दोन ते तीन महिने उलटून जातात.या विलंबामुळे घरकुल बांधकामाच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत आहे. तसेच शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याच्या कारणामुळे मागील एक ते दीड वर्षांपासून अनेक घरकुलांचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. बांधकामासाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे, मजुरी देणे तसेच कामाची सातत्याने पूर्तता करणे लाभार्थ्यांसाठी अत्यंत कठीण झाले आहे.स्वतःचे जुने कच्चे घर पाडून नवीन घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक लाभार्थ्यांना निधीच्या विलंबामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी घरकुल योजनेबाबत नाराजी व्यक्त करीत असून त्यांचा योजनेवरील विश्वास कमी होत आहे. सध्याची SMS स्पर्श प्रणाली लाभार्थ्यांसाठी दिलासादायक न ठरता त्रासदायक ठरत आहे. त्यात घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर सातत्याने वाढत असून वेळेवर अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे लाभार्थ्यांना कर्ज काढून किंवा उसनवारी करून बांधकाम सुरू ठेवावे लागत आहे. यामुळे आर्थिक भार वाढत असून अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण अवस्थेत राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. वरिष्ट स्तरावर पाठ पुराव करुन लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते नियमित व वेळेत अदा करण्यात यावेत तसेच एसएमएस स्पर्श प्रणाली रद्द करून पूर्वीप्रमाणे जलद अनुदान वितरणाची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी टुनकी ग्रा पं सरपंचा तथा प्रशासक सिमा राजेन्द्र वानखडे यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!