मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्षपदी शेख मोबीन शेख रहमान

मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्षपदी शेख मोबीन शेख रहमान
संग्रामपुर [प्रतिनिधी] मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शेख मोबीन शेख रहमान यांची मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रिझवान खान यांनी नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजहिताचे कार्य सातत्याने केले आहे. शिक्षण, सामाजिक विकास आणि समाजातील गरजू घटकांसाठी त्यांनी विविध स्तरांवर उल्लेखनीय योगदान दिले आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांच्या आदेशानुसार, मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रिझवान खान यांनी शेख मोबीन शेख रहमान यांची बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.या नियुक्तीमुळे बुलढाणा उत्तर जिल्ह्यात मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. शेख मोबीन शेख रहमान यांच्यावर विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


