संग्रामपूरात संत गुलाब बाबा विद्यालयात स्वच्छता बाबत शपथ घेऊन श्रमदान केले माय भारतचा स्तृत्य उपक्रम

संग्रामपूर [प्रतिनिधी ] माय भारत बुलढाणा यांच्या वतीने श्री संत गुलाब बाबा विद्यालय, संग्रामपूर येथे स्वच्छता पखवाड्यानिमित्त श्रमदान व स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एम. थोटागे होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी उपस्थित युवक-युवतींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छतेबाबत सखोल मार्गदर्शन केले.यावेळी माय भारतचे स्वयंसेवक सुरज बोरसे यांनी माय भारत अभियान तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करत आपले मनोगत व्यक्त केले. श्रमदान सुरू करण्यापूर्वी उपस्थितांनी स्वच्छता शपथ घेतली. त्यानंतर विद्यालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित युवक-युवतींनी श्रमदान करून परिसराची स्वच्छता केली.कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक एस. आर. मानकर, अमर बोरसे, शिक्षक ए. एच. ढगे, बी. डी. अंभोरे, पी. एम. इंगळे, एकनाथ पाचमासे, गोपाळ राहाटे, आशीष चरखे, संदीप राऊत, शरद घुईकर, आशीष फोकमारे यांच्यासह युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.


