विशेष बातमी
शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुन वेठीस धरणाऱ्या बॅकाना जाब विचारा फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन भाजपाचा ईशारा

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] शेतकरी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुनये असे राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असतांना राष्ट्रीय कृत बॅकानी मन मानीचा कळस गाठत शेतकऱ्यांच्या खाते होल्ड केल्याने शेतकरी अस्वस्थ व अडचणीत सापडले तहसिलदार डीडी आर अधिकारी यांनी राष्ट्रीय कृत बॅकांना समज देऊन शेतकऱ्यांच्या खात्याचे होल्ड काढण्याचे आदेश द्यावे कारणे दाखवा नोटीस बजावुन फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा भाजपा पदाधिकारी शेतकऱ्यांच्या सह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांनी दिला आहे पुर्वीच शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला नानाविध संकटाचा सामना करित असल्याने राज्य शासनाला याची जाण असल्याने पि एम किसान अतिवृष्टी , पिक विमा आर्थिक मदत डिबीटीच्या माध्यमातुन सरळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करित आहे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुनये असे शासनाचे आदेश असतांना शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत बॅकांनी गेल्या दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यांना होल्ड लावुन बॅंका शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे.संग्रामपुर तालुक्यातील सर्व मंडळे दुष्काळ सदृश्य घोषित शासनाने केले आहे यात काही नियम ही घोषित केले आहे तहसीलदार,डीडी आर यांनी या बॅंकाना शोकाॕस नोटीस बजावून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.अन्यथा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अश्या बॅंकाना धडा शिकवेल असा ईशारा भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांनी दिला आहे