विशेष लेख

सावळी ग्रामविकास मॉडेल – धाड जिल्हा परिषद सर्कलच्या सर्व १३ गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी दिशादर्शक

धाड प्रतिनिधी :- आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण धाड मंडळातील ग्रामस्थांच्या आशा-अपेक्षा शिखरावर आहेत. मतदार आपल्या गावाच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी सज्ज होत असताना, सावळी गावाने निर्माण केलेले आदर्श विकासमॉडेल संपूर्ण विभागासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
डॉ. तेजराव नरवाडे आणि साविताताई नरवाडे या दांपत्याने ज्या प्रकारे स्वतःच्या कष्टाने, त्यागाने व लोकाभिमुख दृष्टिकोनातून सावळीचे रूपांतर “आदर्श ग्राम” म्हणून केले, तो परिवर्तनाचा प्रवास आज धाड मंडळातील सर्व ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे.
सावळी गावातील विकास हा केवळ योजना-निधीचा परिणाम नाही, तर त्याग, दृष्टीकोन आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची साक्ष आहे.
ग्रामपंचायत इमारतीसाठी स्वतःच्या घरासाठी वापरलेले दर्जेदार बांधकाम साहित्यच वापरून पारदर्शक कारभाराची उंची दाखवली.
या कलयुगात, जिथे पायभर जमीनीवरुन भांडण होतात, तिथे नरवाडे कुटुंबाने लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली ३१ गुंठे जमीन गावातील स्मशानभूमी व जिल्हा परिषद शाळेसाठी उदार मनाने दान करून “सामाजिक कर्तव्याची नवी व्याख्या” केली.
आपल्या स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतून घडवून एकास IAS विशाल नरवाडे, तर दुसऱ्याला MBBS डॉक्टर प्रतिभा बनवूनही, गावातील गोरगरीब इतर मुलांनाही त्याच गुणवत्तेचे शिक्षण मिळावे म्हणून २१ गुंठे जमीन खरेदी करून शाळेसाठी दान करून आधुनिक शाळा उभी केली.
सावळी गावाने सलग ४ वेळा संपूर्ण अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राच्या नकाशावर आपले नाव चमकवले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सावळीचा ध्वज सतत उंचावत ठेवण्यात डॉ. नरवाडे यांचे योगदान अमूल्य आहे.
राष्ट्रपती-प्रधानमंत्रींपर्यंत सावळी गावाचा गौरव १५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी सावळीच्या सरपंचांचा सन्मान झाला – हा केवळ व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण गावाचा राष्ट्रीय अभिमानाचा क्षण होता.
सावळी गाव नव्या युगाचा आदर्श मॉडेल आहे.
गावातील विकासामुळे, सावळीला तालुकास्तरीय प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट युनिट मिळाले.
राज्यस्तरीय पंचायत लर्निंग सेंटर म्हणून यशदा, पुणे कडून मानांकन प्राप्त झाले.
गरीब मुला-मुलींसाठी मोफत विवाह व्यवस्थेची सुविधा म्हणून समाजमंदिर व विवाह मंडप बांधले.
स्वतःचा मुलगा आय.ए. एस. विशाल नरवाडे यांच्या लग्नात आलेला लाखो रुपयांचा लग्न आहेर डाॅ. नरवाडे यांनी गावातील महादेव संस्थानच्या विकासाठी दान केला.
सावळी गाव हे फक्त एक गाव नाही, तर “विकासाची शाळा” आहे.
आज धाड मंडळातील धाड, ढाळसावंगी, चांडोळ, इरला, म्हसला, बोदेगाव, ढंगारपूर, जांब, मौंढाळा, बोरखेड, करडी यांसह एकूण १३ गावे सावळीच्या विकासमॉडेलवर चालत नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहेत.
डॉ. नरवाडे यांची दृष्टी – “स्वतः घडायचं आणि आपल्या गावाला घडवायचं”
ही दृष्टी आता संपूर्ण धाड सर्कलचा विकासाचा महामार्ग ठरणार आहे.
मतदारांना दिलेला संदेश स्पष्ट आहे – विकासाची भाषा बोलणाऱ्यांना निवडा, केवळ वचन देणाऱ्यांना नाही. सावळी मॉडेल हे सिद्ध करते की नेता बदलला तर गावाचे भविष्य बदलते, तक्रारी कमी होऊन प्रगतीचे दरवाजे उघडतात.”सावळीचा विकास हा केवळ इतिहास नसून, धाड परिसराच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!