सेवानिवृत्त मुख्यध्यापक श्रीरंग गीऱ्हे गुरुजी यांचे निधन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातूर्डा येथील सेवानिवृत्त उच्च श्रेणी मुख्याध्यापक तथा काँग्रेस नेते श्रीरंग नामदेव गी ऱ्हे दि १८ नोव्हे रोजी हृदय विकाराने निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ८४ वर्ष होते. त्यांच्या मागे चार मुली नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. काँग्रेस मध्ये त्यांनी विविध पदे भूषविली. त्यांच्या पत्नी मनोरमा गिऱ्हे या सन १९९७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य होत्या. कॉग्रेस नेते माजी केंन्द्रीय मंत्री खा मुकुल वासनिक व माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचे ते खंदे समर्थक होते. जिल्हा काँग्रेस मध्ये त्यांनी चांगले काम केले. स्थानिक महसिद्ध अर्बन शाखेत त्यांनी मोलाचे सहकार्य दिले. येत्या २६ नोव्हेंबर संविधान दिनी त्यांच्या वाढ दिवसा निमित्त त्यांच्या ईच्छे नुसार भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आमंत्रित सर्व समाजातील नागरिकांसाठी पंगत साठी आचारीला अडव्हांस दिले होते भव्य असे वाढदिवसाचे नियोजन केले होते. मात्र त्या ऐवजी आता त्यांचा स्थानिक स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आहे. मनमिळाऊ स्वभावाचे सुपरिचित असलेले व्यक्तीमत्व गिऱ्हे गुरुजी यांच्या निधनाने पातुर्डा गाव सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दैनिक विदर्भ दस्तक परिवारा कडून गिऱ्हे गुरु यांना भावपुर्ण श्रध्दांजली



