महाराष्ट्र

चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण संपन्न; विविध उपक्रमांनी साजरा झाला पत्रकार दिन

चिखली : चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व शिवसेना नेते नरेंद्र खेडेकर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते संजय मोहिते यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार, कैलास गाडेकर यांना शोध पत्रकारिता पुरस्कार व छोटू कांबळे यांना नव पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.नायब तहसीलदार संजय टाके, ठाणेदार संग्राम पाटील, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सीमाताई नरोडे, जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, मनसे शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलेश गोंधणे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, अंकुशराव पाटील, मनसे शहराध्यक्ष नारायण देशमुख, प्राचार्य डॉ. किशोर वळसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र तोडकर, उबेद अली खान, माजी नगरसेवक आसिफ भाई, प्राचार्य निलेश गावंडे, माजी नगरसेवक गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनिल कराडे, माजी अध्यक्ष अॅड. शेख सलीम, शेख करामात, डॉ. ज्योतीताई खेडेकरआदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात येते. तालुका पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो; यंदा या पुरस्काराचे आठवे वर्ष होते. बुलढाणा येथील जेष्ठ पत्रकार संजय मोहिते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आलेला स्व. गिरीश दुबे नव पत्रकारिता पुरस्कार यंदा आम्ही चिखलीकर दैनिकाचे संपादक छोटू कांबळे यांना देण्यात आला. तालुका पत्रकार संघातर्फे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला शोध पत्रकारिता पुरस्कार पुण्यनगरीचे प्रतिनिधी कैलास गाडेकर यांना सन्मानपूर्वक देण्यात आला.

चिखली शहर व तालुक्यातील पत्रकारिता अतिशय सकस असून अन्यायाला वाचा फोडणे तसेच विकास कार्यामध्ये आपले योगदान देणे ही येथील पत्रकारांची परंपरा राहिल्याचे मत याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव विद्याधर महाले यांनी व्यक्त केले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे अभिनंदन करत पत्रकारांनी आपल्या लेखणीची धार अशीच कायम ठेवावी व समाजातील अन्यायग्रस्त वर्गाला न्याय देण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी सेवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पालवे, शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सीमाताई नरोडे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देवडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. किशोर वळसे यांनी पत्रकार कल्याण निधीसाठी ५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. पत्रकार संघाचे सदस्य सत्य कुटे यांच्या ‘ दीपस्तंभ ‘ या पत्रकारिता विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. याशिवाय पत्रकार संघाच्या सदस्यांची मोफत रक्ता तपासणी देखील करण्यात आली, तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे अध्यक्ष प्रशांत डोंगरदिवे व वृत्तपत्र वितरक गजानन बावणे यांचा देखील तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला. संजय मोहिते कैलास गाडेकर व छोटू कांबळे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना पत्रकार संघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या पुरस्कारामुळे आपल्याला अधिकाधिक समाजाभिमुख पत्रकारिता करण्याची प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुकादास मुळे व प्रास्ताविक इफ्तेखार खान यांनी केले तर सत्य कुटे यांनी आभार व्यक्त केले. तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कमलाकर खेडेकर, सचिव तौफिक अहमद, सहसचिव इमरान शहा, संघटक नितीन फुलझाडे यांच्यासह संतोष लोखंडे, कैलास शर्मा, रवींद्र फोलाने, रमाकांत कपूर, महेश गोंधणे, भारत जोगदंडे, रमिझ राजा, साबिर शेख ,सय्यद साहिल आधी पत्रकार बांधवांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला सामूहिक राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *