कृषीब्रेकिंग न्यूज
बिबट्याने पाडला ५ बकऱ्यांचा फडशा काकनवाडा बु येथील घटना संबंधीत पशुपालक शेतकऱ्यांचे ४० हजाराचे नुकसान

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील काकनवाडा खुर्द वान नदीकाठी १ महिण्यापुर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते वनविभाग विभागा कडून बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कमेरा लावण्यात आले तालुक्यातील काकणवाडा बु येथील पशुपालक शेतकरी गजानन देवराव हिप्परकार यांच्या घरा लगत असलेल्या गोठ्यात दि ३० डिसेंबरच्या मध्यरात्री बिबट्याने गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला करुन ४ लहान व १ मोठी बकरी अश्या ५ बकऱ्यांना ठार केले संबंधीत शेतकरी ३१ डिसेंबर च्या सकाळी गोठ्यात झाड झुड करण्यासाठी गेले असता सदर घटना उघडकीस आली यात पशुपालक शेतकऱ्यांचे ४० हजार रुपायाचे आर्थिक नुकसान झाले सदर घटनेची माहिती व्हिडीओ व्दारे काकनवाडा बु येथील पोलीस पाटिल सौ किरन विजय इंगळे यांनी वनविभागाला दिल्या वरुन वनपाल एस एस सावळे , वनरक्षक जी एस साकळे, वनसेवक अमोल शेकोकार , गणेश तराळे, यांनी घटना स्थळी पोहचल्या नंतर घटना परिसरातील हिस्त्र प्राण्याच्या ठस्याचे नमुने घेतले घटना स्थळाचा पंचनामा केला हिस्त्र प्राणी बिबट्या असल्याचे वनविभागाच्या सुत्राने सांगीतले व पशुवैधकिय अधिकारी डॉ आर डी कलाने यांनी मृतक बकऱ्यांचे श्वविच्छेदन केले यावेळी पोलीस पाटील सौ किरण विजय इंगळे , संतोष इंगळे , सामाजीक कार्यकर्ते दिपक पाटील , आशुतोष रावणकार , अरुण वानखेडे , शेख अकिल , काकनवाडा येथील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते



