क्राईम
२ ब्रास अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले महसुल पथकाची चांगेफळ शिवारात धडक कारवाई

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील चांगेफळ फाटा रसत्यावर रात्री ८ :३० वाजता विना परवाना अवैध रेती वाहतुक करतांना १२१५ एम एच बी बी ८१०६ टिप्परवर महसुल पथकाने कारवाई केली अवैध रेती वाहतुक सदर टिप्परला थांबवुन रेती वाहतुक परवाना बाबत विचारणा केली असता मिळून न आल्याने महसुल अधिकारी अविनाश खरे , महसुल अधिकारी संतोष खारोले यांनी घटनास्थळी पंचनामा करुन संदिप गावंडे रा जळगाव जा याच्या मालकीच्या १२१५ टिप्पर क्र एमएच २८ बीबी ८१०६ वाहणात २ ब्रॉस अवैध रेती विना परवाना वाहतुक करतांना आढळल्याने सदर टिप्पर व मालका वर दंडात्मक कारवाई करुन अवैध रेतीचे वाहन जप्त केले व तामगाव पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाने धडक कारवाईची अवैध रेती व्यवसाईकांत दहशत निर्माण झाली अवैध रेती वाहतुक करणाऱ्यावर कारवाई सुरुच राहणार असल्याची प्रतिक्रिया तहसिलदार प्रशांत पाटील यांनी बोलतांना दिली तहसिलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात महसुल पथकातील नायब तहसिलदार विकास शिंदे , एन . टी राहुल वसावे ,महसुल अधिकारी अविनाश खरे , महसुल अधिकारी संतोष खारोले यांनी सदर कारवाई केली



