क्राईमब्रेकिंग न्यूज

५ देशी पिस्टल , २मॅगझिन, १६ जिवंत काडतुस, चारचाकी वाहना सह ७ लाख ३३ हजार सहाशे रुपायाचा मुद्देमाल जप्त २ आरोपी अटक सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांची धडक कारवाई

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा पोस्टे हद्दितील टुनकी ते सोनाळा दरम्यान रोडवर स्विप्ट डिजायर चारचाकी पांढऱ्या रंगाचे वाहन क्र एम पी २० CG 1667 असलेल्या वाहनात अवैध पिस्टल घेऊन जात असल्याच्या गुप्त माहिती वरुन सोनाळा पोलीस आरोपीच्या मार्गावर होते सोनाजी नगर हनुमान मंदिरा जवळ उपरोक्त वाहन थांबवुन सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील आपल्या पोलीस पथका सह वाहनात बसलेल्या ३ आरोपी पैकी १ पिस्टल देणारा अज्ञात आरोपी फरार झाला तर संशयीत २ आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या कडे ५ देशी स्टीलचे पिस्टल प्रत्येकी किंम्मत ४० हजार , एकुण किं २ लाख , २ अतिरिक्त मॅगझिन प्रत्येकी किं ३ हजार , एकुण कि ६ हजार १६ जिवंत काडतुस प्रत्येकी किं १ हजार एकुण कि १६ हजार , स्विप्ट डिझायर पांढऱ्या रंगाची कार , २ मोबाईल , रोख सोळाशे असे एकुण ७ लाख ३३ हजार सहाशे रुपायाचा मुद्देमाल सोनाळा पोलीसांनी जप्त केला व आरोपी मो नफीज अकील अली वय २४ , मो उबेद रजा मो अल्फाज वय २१ वर्ष दोघे राहणार चांदामेठा ता परासिया जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश या दोन आरोपी विरुद्ध सोनाळा पोलीसांनी भारतीय शस्त्र कायदा कलम ३ , ७ , २५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केले जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे , अप्पर पो अधिक्षक डॉ श्रेणीक लोढा, अप्पर पो अधिक्षक अमोल गायकवाड , उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन , स्था गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर यांच्या मार्गदर्शना खाली सदर कारवाई सोनाळा पोस्टे ठाणेदार चंद्रकांत पाटील , पो हे कॉ विशाल गवई , पो हे कॉ रमेश खरात , पो कॉ राहुल पवार पो कॉ शेख ईम्रान , गणेश मोरखडे , राजु गव्हांदे , संजय सास्ते , गणेश राठोड यांनी केली आहे
पुढील तपास सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील करित आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!