एकलारा बानोदा येथील त्या अपघातातील ४२ वर्षीय गंभीर जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू

संग्रामपूर [प्रतिनिधी ] तालुक्यातील एकलारा येथील ४२ वर्षीय किसन मारोती पवार रात्री शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी पाई जात असतांना वरवट बकाल ते सोनाळा रोडवरील बानोदा एका धाब्या समोर पाण्याचे वॉलजवळ ५ दिवसा पुर्वी रात्रीच्या सुमारात मारुती सुझुकी गाडी क्र. MH-28 CC- 0159 धडक दिल्याने किसन पवार याचा गंभीर अपघात झाला होता. गंभीर जखमी किसन पवार यांच्या वर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरु होते अखेर उपचारा दरम्यान २७ डिसेंबर रोजी ५ व्या दिवशी मृत्यू झाला. मृतकचा भाऊ उमेश पवार यानी तामगाव पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीसांनी इको मारुती सुझुकी क्रमांक MH-28-CC 0159 आरोपी चालक सत्यनारायण जोशी यांच्या विरुध्द कलम 281,125(अ),125(ब),बि एन एस2023 सहकलम 184 मोटर वाहन कायद्या नुसार दाखल करण्यात आला तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार ए एस आय अशोक वावगे करित आहेत



