क्राईम

देशी दारुची दुचाकी वरुन वाहतुक ५६ हजार रुपयांच्या मुद्देमाल सह १ आरोपी सोनाळा पोलीसांच्या ताब्यात

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा पोलीसांनी लाडनापुर फाट्यावर देशी दारूची दुचाकी वरुन वाहतूक करणाऱ्या निमखेड येथील ५२ वर्षी आरोपी कडून दुचाकी सह देशी दारु ५६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सोनाळा पोलिस स्टेला फिर्यार्दी पो कॉ राहुल पवार यांच्या फिर्यार्दी वरुन आरोपी विजय गोमासे याच्या विरुध्द कलम ६५(अ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत सोनाळा पोलीसांनी कारवाई करुन आरोपी विजय पुंडलिक गोमासे वय ५२ वर्ष रा निमखेड याला अटक केले. याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील आदिवासी बहुल गाव निमखेड येथील १ ईसम दुचाकी वरून देशी दारुची वाहतुक करित असल्याची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना मिळताच त्यांनी सुत्रे हलविले लाडणापुर फाट्यावर सोनाळा पोलिसांनी आरोपीकडून ‘बिग बॉस ५०००’ या देशी दारूच्या प्रत्येकी ९० मि.ली.च्या ४०० शिश्या प्रत्येकी किंमत ४० असा १६ हजार किंमतीचा माल तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली विना नंबरची स्प्लेंडर प्लस दुचाकी किंमत ४० हजार एकूण ५६ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विशाल गवई, विनोद शिंब्रे, राहुल पवार, संदीप पवार , गणेश मोरखडे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. पुढील तपास पोहेकॉ विशाल गवई हे करीत आहेत. यापुर्वी ५ पिस्ट, जिवंत काडतुस मॅगझिन चार चाकी वाहन ७ लक्ष रुपायाच्या मुद्देमाल सह मध्यप्रदेशातील २ आरोपींना अटक केले एका आठवड्यात सोनाळा पोलीसांची दुसरी धडक कारवाई आहे हे विशेष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!