तामगाव पोलीसांचे रन फॉर युनिटी अंतर्गत सामाजीक सुरक्षितता ,आरोग्य सह राष्ट्रीय एकतेचा संदेश

संग्रामपुर [प्रतिनिधी ]भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधुन बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याचाच एक भाग म्हणुन संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिस स्टेशनमध्ये रन फॉर युनिटीचे आयोजन केले होते. देशभक्ती गीत , विद्यार्थीच्या हातात राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश फलक , तसेच तामगाव पोलिस स्टेशन ते जिल्हा परिषद हायस्कूल, संग्रामपूर पर्यंत धाव व वॉक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी स्थानिक नागरिक सहभागी होऊन एकता सामाजीक बांधीलकी व फिटनेसचा संदेश व प्रतिसाद दिली तामगाव पोलीस स्टेशन मध्ये सर्व प्रथम सरदार वल्लभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुजन दिप प्रज्वलनाने तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक मनोगतातुन ठाणेदार सोनवणे यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकून भारतीय एकता व अखंडते करिता मोलाचे योगदान असलेले लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार गुण अंगीकारण्याचे आव्हान केले सहाय्यक पो उ नि राजेन्द्र पवार यांनी सांगीतले कि एकता अनुशासन , सामुहिक सहभाग हाच देशाच्या प्रगतीचा पाया आहे असल्याचे मत व्यक्त केले ठाणेदार पंडितराव सोनवणे यांनी तामगाव पोस्टेच्या प्रांगणात हिरवी झेंडी दाखवुन धावण्याची व वॉक स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सदर दौड स्पर्धा तामगाव पोस्टे ते जि प हा संग्रामपूर पर्यंत आयोजीत करण्यात आली होती याप्रसंगी ३ पोलिस अधिकारी, २५ पोलिस कॉन्स्टेबल, होमगार्ड सैनिकांसह सुमारे दोनशे नागरिक, विद्यार्थी शिक्षक दौड स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते जिल्हा परिषद येथे आयोजीत छोटे कार्यक्रमादरम्यान मान्यवरांची समायोचीत भाषणे झालीत सर्व शासकिय निमशासकीय शिक्षक विद्यार्थीच्या व नागरिकांच्या सहभाग नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकता , सामाजीक सुरक्षितता, आरोग्य व फिटनेस विषयी जागृती निर्माण करणे हे होते हे सदर उपक्रमाचे उदिष्ट होते उपस्थितांनी राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. तामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शिक्षक विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले



