आरोग्यशिक्षण

औषध व्यवसाय हा कायद्याच्या चौकटीत राहून करावा सहाय्यक आयुक्त गजानन मिरगे                 संग्रामपुरात औषधी कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट अंतर्गत औषध व्यवसायासाठी लागू असलेले कायदे, नियम, परवाने, नोंदवही, औषध विक्री व साठवणुकी बाबत सविस्तर माहिती दिली व औषध व्यवसाय हा कायद्याच्या चौकटीत राहून करावा असल्याचे मत अन्न प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन मिरगे यांनी येथील पं स छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अन्न व औषध प्रशासन विभाग, बुलढाणा यांच्या वतीने आयोजीत औषधी कायद्यांविषयी मार्गदर्शन औषधी कायदेविषयक कार्यशाळेत केले सदर कार्यशाळा दि ८ जानेवारी रोजी संपन्न झाली.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी अन्न व औषध प्रशासन विभाग, बुलढाणा येथील सहाय्यक आयुक्त गजानन गिरगे हे उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक व संचालन संघटनेचे गोपाल गांधी यांनी केले.यावेळी तालुका अध्यक्ष उमेश इंगळे यांनी आधुनिक काळातील फार्मासिस्ट व केमिस्ट कसा असावा, व्यवसायातील नैतिकता, रुग्ण सुरक्षा व कायद्याचे पालन यावर मार्गदर्शन .सदर कार्यशाळेमुळे औषध व्यवसायात कायदेशीर शिस्त, पारदर्शकता व रुग्ण सुरक्षेला चालना मिळणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.सदर कार्यशाळेमध्ये ज्येष्ठ फार्मासिस्ट पांडुरंग इंगळे, प्रमोद टाकळकर, संजय उकडे, दामोदरदासजी राठी राजेश राठी, शेख मोबीन तसेच युवा फार्मासिस्ट अनिकेत उमरकर, अविनाश ढगे, सुरज बारब्दे यांच्यासह महिला फार्मासिस्ट व संग्रामपूर तालुक्यातील सर्व फार्मासिस्ट व केमिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!