जिल्हा वार्ता

विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत वरवट खंडेरावचे गुरुदेव मित्र भजन मंडळ द्वितीय १५ हजार रोख सन्मान चिन्ह देऊन गौरव  

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट खंडेराव भजन मंडळाने  दर्यापूर येथे विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत व्दितीय क्रमांक पटकाविले  विदर्भातील ३३ भजन मंडळांनी या भजन स्पर्धेत सहभाग घेतला होता. विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक संत बिरबलनाथ महाराज भजन मंडळ (गिंभा, ता. मंगरूळ, जि. वाशिम) यांनी पटकाविला, तर द्वितीय क्रमांक हा संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथील गुरुदेव मित्र भजन मंडळ यांनी पटकाविला तृतीय क्रमांक गुरुदेव सेवा भजन मंडळ (साखरी, ता. अचलपूर), तर शिस्तबद्ध मंडळ म्हणून चंपामाता भजन मंडळ (माळेगाव) यांची निवड करण्यात आली. अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, सुधाकर भारसाकळे होते. श्रीरंग पाटील यांच्या हस्ते संग्रामपूर तालुक्यातील वरवट खंडेराव येथील गुरुदेव मित्र भजन मंडळाना पारितोषिक रोख बक्षीस १५ हजार रुपये देण्यात आले यावेळी वरवट खंडेराव येथील गुरुदेव मित्र भजन मंडळाचे रामदास महाले.गजानन लासुरकर.अरुण राठोड रमेश तळोकार.श्रेयश लोनकर ,विजय कुयटे.ठाकूर साहेब पांडूरंग टाकळकार.गजानन क्षिरसागर प्रनवतळोकार.विशाल जळमकार गणेश दोरकर.बाळू ठाकरे यांच्या सह आदी गुरुदेव भजन मंडळाचे सदस्य यानी विदर्भ स्तरिय भजन स्पर्धेत भाग घेतला होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!