जिल्हा वार्ता

युवा शिवसेना जिल्हाध्यक्ष चेतन घिवे यांच्या कडून पत्रकारांचा सन्मान संग्रामपूर तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी प्रल्हाद दातार

 

संग्रामपूर [प्रतिनिधी ] पत्रकार दिनाचे औचीत्य साधुन संग्रामपूर वरवट बकाल रस्त्यावरील शेतकरी जिंनीग मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात आज १८ जानेवारी रोजी संग्रामपुर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ पेन डायरी देऊन यथोचीत सन्मान करण्यात आला. शिवसेना युवा जिल्हा अध्यक्ष चेतन घिवे पाटील यांचेवतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम दिवंगत केशव अण्णा घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने तालुका अध्यक्ष या रिक्त पदावर संग्रामपुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार संपादक प्रल्हाद आनंदराव दातार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थीत पत्रकार बांधवांनी प्रल्हाद दातार यांच्या निवडीला अनुमोदन दिले.स्व. केशव अण्णा घाटे यांचे समाज कार्य व पत्रकारीतेचा वारसा आपण सर्वां मिळून यापुढे चालवू असा विश्वासू नव-निर्वाचीत तालुका अध्यक्ष प्रल्हाद दातार ,ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी मनोगत व्यक्त करताना व्यक्त केला. पत्रकार संघाचे माजी तालुका अध्यक्ष प्रल्हाद सावतकार यांनी केशव अण्णा घाटे यांच्या आठवणी व त्यांचे लोकाभिमुख कार्य मनोगत व्यक्त करतांना सांगीतले, कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा अध्यक्ष चेतन घिवे यांनी सर्व पत्रकार बांधवां चे आभार व्यक्त करून सर्व पत्रकार बांधवांना शाल, पेन डायरीचे सन्मानपुर्वक वाटप केले. याच कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पदी सचिन पाटील, सचिव पदी सुचित धनभर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली .तर जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांना राज्य कार्यकारीणीवर पाठवण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने यांनी आभार व्यक्त करतांना शिवसेना जिल्हा प्रमुख चेतन घिवे यांनी आयोजीत केलेल्या या सन्मान सोहळ्याची मुक्तकंठाने प्रशंसा करून त्यांच्या राजकीय सामाजीक कार्याला भरभरून शुभेच्छा प्रदान केल्या. नारायण सावतकर यांनी संचलन केले. यावेळी भाऊ भोजने,
काशिनाथ मानकर,डॉ.सहदेवराव गोतमारे , प्रल्हाद सावतकार, मिर मकसूद अली,दयालसिंग चव्हाण,नारायण सावतकर,सतीश वानखडे , युसुफ शेख,अशोक अकोटकार, रवि शिरस्कार,सुनील ढगे, नामदेवराव येऊतकर ,सचिन पाटील,प्रभू पारसकार,
,रविंद्र दांडगे, नंदुकिशोर शिरसोले, डॉ समीर शेख, सुचित धनभर, साबीर खान , मतीन शेख , कैलास खोट्टे, सुमेध दामधर,संतोष देऊकार,कैलास अवचार पाटील हनुमानसिंग राजपुरोहित,प्रकाश टाकळकर, आशिष सातव,सुनील मुकुंद, श्याम वाघ, श्याम खंडागळे, श्याम बोरपी ,भगवंता चोरे ,निलेश लहासे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!