जिल्हा वार्ता

शिव महापुराण कथेचे श्रवण करा मन शुद्ध होइल  नकारात्मक विचार दूर होतील  -ह भ प नागेश महाराज आगलावे .

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील प्राचीन पाय विहीर शिव मंदिरा समोर एका शेतात दि १० फेब्रुवारी पासुन शिव पुराण कथेचा व अखंण्ड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ  झाला राधाकृष्ण संस्थान येथून कलश यात्रेची मिरवणूक काढून कथेस्थळी आली  प्रकाश देशमुख व विजय बोराखडे यांनी  सपत्नीक शिवमहा पुराण ग्रंथाची विधिवंत पुजा केली शिवमहापुराण कथा व अखण्ड हरिनाम सप्ताहाला  नागेश महाराज आगलावे यांच्या  अभ्यासपुर्ण मुदु वाणीतून सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रम सात दिवस चालणार असल्याने दोन पारी शिवमहापुराण कथा पातुर्डा पंचक्रोशीतील भावीकांसाठी भक्तीपरवणी मेजवानीच आहे   हभप नागेश आगलावे महाराज उपस्थित श्रोत्यांना म्हणाले कि शिवपुराण ग्रंथामधे  चौवीश हजार श्लोक असून त्यात सात संहिता आहेत शिवपुराण ग्रंथ हा पवित्र प्राचीन ग्रंथ असुन  शिव महापुराण कथेचे श्रवण करा मन शुद्धी होईल नकारात्मक विचार दूर होतील त्याच बरोबर मानसिक शांतता लाभून आपल्या जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते
शिवपुराण कथेचा सार म्हणजे भगवान शिवाच्या भक्तीचे महत्त्व, त्याच्या शक्तीचे वर्णन,  त्याच्या कृपेचा लाभ घेण्याचा मार्ग आहे.शिवपुराण कथा वाचल्याने आपल्याला शिवाच्या शक्तीचे ज्ञान तर होतेच त्याच्या कृपेचा लाभ घेता येतो, तसेच भक्तीचे महत्त्व समजते. धर्म कर्म व ज्ञान यांचे महत्त्व अत्यंत सोप्या पद्धतीत सांगितले ही कथा कार्यक्रमाला आल्या नंतर मनाची एकाग्रता ठेऊन  दैनंदिन जीवनात सदाचार संयम आणि भक्ती आचरात आणण्याची गरज आहे असे  हभप नागेश आगलावे महाराज म्हणाले यावेळी शिव पुराण कथेचा व अखंण्ड हरिनाम सप्ताहा या धार्मिक जीवनात सदाचार संयम व भक्ती परवणी साठी दररोज पातुर्डा पंचकोशीतील श्रोत्यांची विशेष महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहत आहे
                     बॉक्स
कथा काळात सकाळी काकडा आरती , दुपारी ५ ते ७ सायंकाळी ७ ते १० पर्यंत  हरिकथन तसेच ह भ प रविन्द्र महाराज खेळकर , हभप कृष्णामाऊली सुरुकार , हभप विठ्ठल धोतडेकर , हभप संभाजी महाराज , निलेश भोजी महाराज , हभप राजेन्द्र वक्तते  , हभप मुकुलधीर लोणाग्रे महाराज हे किर्तनकार दैनदिन कार्यक्रमा स्थळी उपस्थित राहून  किर्तनसेवा देत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!