जिल्हा वार्ता
टुनकी येथील २० वर्षीय युवकाचा मृतदेह विहीरीत आढळला

टुनकी येथील २० वर्षीय युवकाचा मृतदेह विहीरीत आढळला
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील टुनकी येथील २० वर्षीय युवकाचा पंचाळा शेतशिवारातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृतक युवकाचे नाव दीपक संजय झामरे आहे. १८ सप्टेंबर रोजी दुचाकीने सकाळपासून घरातून निघून गेला होता. कुटुंबीयांनी गावात तसेच परिसरात त्याचा शोध घेतला. अखेर पांचाळा येथील शेतशिवारात एका नातेवाईकांना शेताच्या धुऱ्यावर दीपकची मोटारसायकल आढळून आली. त्यानंतर विहिरीजवळ पाहणी केली असता तेथे त्याचे चप्पल व मोबाईल मिळून आले शोध घेतल्यानंतर दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दीपकचा मृतदेह विहिरीत आढळून आला दिपक शाळेत हरजबाबी तलख बुद्धीचा हुशार होता त्याला अस्थमा आजाराने त्रस्त होता गेल्या काहि महिण्या पासुन सतत नैराश्य स्थितीत राहत होता सदर घटनेची माहिती तामगाव पोलिसांना दिल्या नंतर घटना स्थळी दाखल झाले नातेवाईकांच्या सहकार्याने विहिरीतुन प्रेत बाहेर काढल्या नंतर पंचनामा केला तामगाव पोस्टेला मृतकाचे नातेवाईक गजानन प्रल्हाद झामरे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन तामगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. तामगाव पोस्टेचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस जमादार गाडे करीत आहेत.



