नांदुराऱ्यात एसआय आर प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी हाजी मुज़म्मिल अली खान यांच्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम ! मतदार यादीत नावांची खात्री करून घेण्याचे आवाहन

बुलडाणा [प्रतिनिधी ] बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने पुनर्निरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदार यादीमध्ये आपल्या नावाची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मतदार यादीत नाव नसल्यास, नावामध्ये काही तफावत असल्यास किंवा कुटुंबातील पात्र नवीन मतदाराचे नाव समाविष्ट करावयाचे असल्यास नागरिकांनी वेळेत आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस नेते हाजी मुज़म्मिल अली खान यांनी केले आहे.
नवीन पात्र मतदाराचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी फार्म नं ६, तर नाव, पत्ता, जन्मतारीख अथवा इतर तपशीलामध्ये दुरुस्ती करण्यासाठी फार्म नं ८ भरता येतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाहीत, तसेच नोंदविण्यात आलेली माहिती योग्य आहे किंवा नाही, याची खात्री करून घ्यावी. आवश्यक असल्यास संबंधित अर्ज भरून दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच नांदुरा शहरात हाजी मुज़म्मिल अली खान यांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतदार जनजागृतीची चळवळ सुरू केली होती. नांदुरा शहरातील नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे महत्त्व समजावून सांगण्यासोबतच नावात त्रुटी असल्यास दुरुस्ती करून घेणे, पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेणे तसेच कुटुंबातील सर्व मतदारांच्या नावांची खात्री करणे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती मोहिमेला नांदुरा शहरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे तपासून घेतली व आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती आणि नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे नांदुरा शहरातील एसआय आर प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने व यशस्वीरित्या पार पडण्यास मदत झाली असून नागरिकांमध्येही समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
मतदार यादीतील नाव हे प्रत्येक नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित असल्याने कोणत्याही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ नये, तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिवारातील सर्व मतदारांची नावे तपासून आवश्यक असल्यास फार्म नं ६ किंवा फार्म नं ८ भरून घ्यावा मतदार यादी अचूक करण्यासाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहनही हाजी मुज़म्मिल अली खान यांनी केले आहे.



