धम्मानुसार आचरण करणारा व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडणार नाही ! सुरेखा बर्वे पातुर्ड्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श ऐतिहासिक स्थळी दहा दिवसीय महिला उपासिका शिबीर संपन्न


संग्रामपूर [प्रतिनिधी ] जो व्यक्ती धम्मामध्ये सांगितलेल्या पंचशील व आर्य अष्टांग मार्गानुसार आचरण करेल ती अंधश्रद्धेला बळी पडणार नाही असा दृढ विश्वास भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षका सुरेखा बर्वे यांनी व्यक्त केला.त्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ऐतिहासिक गाव पातुर्डा येथे आयोजित दहा दिवसीय महिला उपासिका शिबीरात अंधश्रद्धा व बुवाबाजी या विषयावर उपस्थितांना संबोधित करीत होत्या.भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व ग्राम शाखा पातुर्डाच्या वतीने दिनांक ४ सप्टेंबर पासुन १३ सप्टेंबर पर्यंत पातुर्डा येथील बुद्ध विहारात ह्या दहा दिवसीय उपासीका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ५० महिला सहभागी झाल्या होत्या .या महिला उपसिका शिबिरामध्ये सुमन सुखदेव वानखडे या ८५ वर्षीय व एका पायाने अपंग असलेल्या महिलेचा सहभाग लक्षवेधी व तरुणींना लाजवणाराच म्हणावा लागेल.भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा हिशोब तपासणीस तुकाराम रोकडे यांनी शिबिरला भेट दिली.यावेळी त्यांनी उपासीका शिबिराचे महत्त्व विषद करुन सांगितले. संचलन पुनम आदित्य वानखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संघमित्रा महिला संघ ,सुजाता महिला संघ व यशोधरा महिला संघ पातुर्डा यांचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव बौद्धचार्य मिलींद वानखडे यांची उपस्थिती होती



