कृषीक्राईमजिल्हा वार्ता

एचटीबीटी बियाणांचा साडेचार लाखांचा साठा जप्त👉 कृषी विभागाची संग्रामपूर तालुक्यात कारवाई 👉दोघेही रंगेहाथ पकडले गेले, त्यापैकी एक फरार झाला. आरोपी अकोला जिल्ह्याचे रहिवासी

एचटीबीटी बियाणांचा साडेचार लाखांचा साठा जप्त👉 कृषी विभागाची संग्रामपूर तालुक्यात कारवाई
👉दोघेही रंगेहाथ पकडले गेले, त्यापैकी एक फरार झाला.
आरोपी अकोला जिल्ह्याचे रहिवासी

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] शासनमान्यता नसलेल्या संशयित एचटीबीटी कापूस बियाणांचा जादा दराने विक्री करण्याच्या उद्देशाने नेण्यात येणारा साडेचार लाख रुपये किमतीचा अवैध साठा कृषी विभागाने संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ पकडला. या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील दोघांना अटक करण्यात आली असून, एकजण फरार झाला आहे. २६ मेच्या सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील तीन आरोपींविरुद्ध तामगाव पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
संग्रामपूर तालुक्यातून काही लोक एचटीबीटी कपाशीचे बियाणे वाहतून घेऊन जात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, अमरावतीचे गुणनियंत्रण तंत्र अधिकारी नितीन लोखंडे, विभागीय गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. संग्रामपूरसह जळगाव
जामोद व शेगाव तालुक्यातील रस्त्यांवर बियाणे निरीक्षकांना तपासणीसाठी थांबवून तपासणी सुरू करण्यात आली. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे मारुती सुझुकी कंपनीचे पांढऱ्या रंगाचे ईको वाहन (क्रमांक एमएच-३०-बीडब्ल्यू-९५८५) संशयावरून थांबविण्यात आले. त्यामध्ये ९ पांढऱ्या रंगाचे कट्टे आढळून आले. त्यात संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांची विविध कंपन्यांची पाकिटे आढळली.या प्रकरणी आरोपी गुलाबराव मुरलीधर ठाकरे, शंकर उत्तम दांदळे दोघे रा. सांगोला ता. पातूर, जि. अकोला या दोन आरोपींना पकडण्यात आले. विनोद पाटील उर्फ विनोद हरिदास वाघमारे (रा. शिरला अंधारे) हा फरार झाला आहे.
संग्रामपूर पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक रविकिरण नायकार यांच्या तक्रारीवरून या सर्व
आरोपींविरुद्ध तामगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३३६ (४), ३ (५) तसेच बियाणे अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि संबंधित नियमांन्वये गुन्हे दाखल केले. तामगाव पोस्टेचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जीवन सोनवणे करीत आहेत.

बॉक्स
जप्त बियाणे येणे प्रमाणे

धूम – २ ची ९९ पाकिटे, चॅम्पियन ५ ची १००, पाकिटे, पिंकगार्ड ४ २०:२० (गोल्डन स्टिकरवरील पिंक रक्षक ५ जी) २५० पाकिटे आणि ईको वाहन जप्त करण्यात आले. या एकूण मुद्देमालाची किंमत ४ लाख ५८ हजार रुपये आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!