कृषीक्रीडा

जागतिक पर्यावरण दिना निमित्त वसाळी छत्रपती शिवाजी महाराज इको सायन्स पार्क,वसाली येथे वृक्षारोपण व मोफत वृक्षवाटप कार्यक्रम संपन्न

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] वृक्षावली आम्हा सोयरे वनचरे हा संत तुकाराम महाराजांचा संदेश मानवाला निसर्गाशी घट नाते जोडण्याची प्रेरणा देतो मात्र आजच्या आधुनिक युगात वाढती जंगलतोड,प्रदूषण आणि ग्लोबल वार्निंग मुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे,या गंभीर समस्ये बाबत जनजागृती व्हावी  पर्यावरण संवर्धनाचे महत्व सर्वा पर्यंत पोहोचावे या उद्देशाने  साला बाद प्रमाणे या वर्षीही वनपरिक्षेत्र कार्यालय सोनाळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज इको सायन्स पार्क,वसाली येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व नागरिकांना वृक्षवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जागतीक पर्यावरण दिना निमित्त पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष रोपन करुन एक झाड मॉ के नाम स्तृत्य उपक्रम अंतर्गत वसाडी ग्रामस्थांना विविध प्रकारच्या वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.मान्यवरांनी आपल्या मनोगतात वृक्षांचे महत्व विशद करत प्रत्येक नागरिकाने एक झाड मॉ के नाम प्रमाणे किमान एक तरी वृक्ष लावून त्यांचे संगोपन करा असे आव्हान केले पर्यावरणाचे रक्षण ही काळाची गरज असून भावी पिढीला हिरवेगार प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा,असे मत यावेळी व्यक्त केले या कार्यक्रमाला वन समितीचे अध्यक्ष गोपाल कास्देकर,वन परीक्षेत्र अधिकारी वन्यजीव सोनाळा अजय बावणे सह वसाडी वर्तुळचे वनपाल सुधीर आंबेकर,गजानन सोळंके,देव बेराड,अनिल पारधी, पवन जग्रवाल, दारासिंग धाडशिंबे,.हरीओम बेठेकर,.मगेश डोंगळे .राणी गरुड ,लीला जामूनकर ,ममता बेटेकर ,यांच्यासह वसाडी ग्रा पं सरपंच समजकोर बाबर व सदस्य रामा डावर,अंबाबरवा असोशियन युनियनचेअध्यक्ष खुमसिंग डावर,उपाअध्यक्ष रवी मांडलेवी,सचिव आरिफ केदार,सिकंदर सिंग बाबर,सुनीलपालकर,मोतीलाल मोरे,सुकलाल डावर,सुमित पालकर,कृष्णा डावर,किशोर सिंग बाबर,नजीर पालकर,अशोक पालकर,किशोरसुरत्ने,अतुल पालकर, अंबाबरावा अभयारण्य मधील सर्व गाईड व जिप्सी चालक व मालक, गावातील नागरिक उपस्थित होते.वसाळी ग्रामस्थांना एक झाड मॉ के नाम स्तृत्य उपक्रमा अंतर्गत विविध प्रजातींच्या वृक्षांचे मोफत वाटप त्यांचे संगोपन करण्याचे आव्हान वनविभागाच्या वतीने करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर स्तृत्य उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!