आंदोलनकृषी

पातूर्डा खेळ थोरात शिवारात वादळाने खांब उन्मळुन पडले तारा लोंबकल्या पेरणीपुर्व मशागत प्रभावित वितरण विभाग कार्यालय समोर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यात सर्वत्र गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पातुर्डा खेळ थोरात शेत शिवारातील सिमेंटचे विजेचे खांब मुळासकट उन्मळून पडले आहेत. ११ हजार व्होल्टच्या जिवंत तारा जमिनीपासून अगदी हाताच्या टापूत लोंबकळत आहेत. हा निव्वळ जीवघेणा प्रकार असतांना त्यात खांब उन्मळुन पडले तारा लोबलेल्या असल्याने पेरणीपुर्व मशागत प्रभावीत झाल्याने हवामान खात्याच्या अंदाज नुसार लवकरच मानसुन धडकणार आहे असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीपुर्व मशागत केव्हा करावी या चिंतेत संबंधीत शेतकरी असुन विद्युत वितरण विभागाने तात्काळ विद्युत खांब व लोबकलेल्या तारा सरळ करुन दुरुस्त कराव्या अशी मांगणी शेतकऱ्यांनी केली आहे
पेरणीच्या तोंडावर शेतकरी मशागत करायला गेला तर खांब आणि तारांचा अडथळा समोर उभा ठाकतो. ट्रॅक्टर फिरवणे अशक्य, मजूर घाबरून काम करणे शक्य नाही. त्यात वीज यंत्रणा कोलमडली. शेतकऱ्यांनी उपकेंद्रावर तोंडी तक्रार केली मात्र अदयापही दुरुस्ती करण्यात आली नाही त्यामुळे पेरणी पूर्व मशागत रखडली असून एक दोन दिवसात पाऊस पडला तर पेरणी कशी करावी हा प्रश्नच शेतकऱ्यांना त्रस्त करित आहे.
तारा अजूनही करंटने पेटलेल्या आहेत की काय अशी भीती शेतकऱ्यांना आहे. एखादा शेतकरी,  शेतमजूर त्याला स्पर्श झाला अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विना विलंब खांब उभे व तारा दुरुस्त न झाल्यास महावितरण उपकेंद्रावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. असा इशारा गट नंबर १५५, १५६ खेळ थोरात शिवारातील शेतकरी राजेशकुमार राठी, मालतीबाई देशमुख, प्रमोद रहाटे, निमकर्डे, श्याम देशमुख यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!