पोलीसांना ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणे भोवले ईसमा विरुद्ध सोनाळा पोस्टेला गुन्हा दाखल

पोलीसांना ११२ वर कॉल करुन खोटी माहिती देणे भोवले ईसमा विरुद्ध सोनाळा पोस्टेला गुन्हा दाखल
संग्रामपुर [प्रतिनिधी ] आपतकालीन स्थिती मध्ये ११२ क्रमांकवर कॉल करुन पोलीसांना खोटी माहिती देऊन पोलीस बोलवणाऱ्या लाडणापुर येथील एका ईसमा विरुद्ध सोनाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील लाडणापुर येथील आरोपी राजु रामभाऊ भालतडक याने डायल ११२ या आपात्कालीन प्रतीसाद यंत्रणेवर कॉल करुन त्याला माहित असलेली माहिती ही खोटी असुन सुध्दा त्याने लोकसेवक असुन ते त्यांचे शासकिय कर्तव्या पार पाडत असता फिर्यादी यांना जाणुन बुजुन खोटी माहिती देवुन त्यांची दिशाभुल केली फिर्यार्दी पोलीस कर्मचारी कैलास सांगळे यांच्या फिर्यार्दी वरुन आरोपी राजु रामभाऊ भालतडक रा लाडणापुर याच्या विरुध्द सोनाळा पोस्टेला अदखलपात्र नोंद क्र २२४ कलम २१२ बी एन एस अंतर्गत कारवाई करण्यात आली सोनाळा पोस्टेचे ठाणेदार संदिप काळे यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास पोलीस जमादार विनोद वानखडे करित आहेत


