आंदोलनकृषी

संग्रामपूरात आमदार बच्चु कडू यांच्या शेतकरी हितार्थ कर्जमाफी आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान कॉग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा यांचा पाठींबा तहसिलदार प्रशांत पाटील यांना निवेदन

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] नागपूर येथे सुरू असलेल्या शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ संग्रामपूरात आमदार बच्चु कडू यांच्या शेतकरी हितार्थ आंदोलनाच्या समर्थनार्थ किसान कॉग्रेस राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा यांच्या सह शेतकरी संघटनेने जाहीर पाठिंबाचे निवेदन तहसिलदार प्रशांत पाटील यांना देण्यात आले. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढलेला असून उत्पादन हे शून्य येत आहे. शेतमाल पिकाला भाव नसून त्यामुळे शेतकरी हा सातत्यपूर्ण कर्जबाजारी राहत आहे. नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी, ओला दुष्काळ, त्यात विविध प्रकारचे येणारे पिकावरील रोग यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक संकटात सापडला आहे. उसनवार व बॅकाचे कर्ज कर्जाचे डोंगर वाढल्याने उत्पन्नाला भाव नाही , उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतीवर काढलेले कर्ज शेतकरी भरू शकत नाही . 2014 पासून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून तो कर्जबाजारी आहे. जोपर्यंत सरकार शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त करत नाही तोपर्यंत शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारणे अशक्य आहे. आमदार बच्चु कडू यांनी चालवलेले आंदोलन सर्व जातीपातीच्या धर्माच्या शेतकऱ्यांसाठी या आंदोलनाला सर्व युवक शेतकऱ्यांचा परिपूर्ण पाठिंबा दर्शविण्यासाठी संग्रामपुर किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश मानखैर पाटील , श्रीकृष्ण दातार अभयसिंह मारोडे दीपक गव्हांदे, प्रवीण मोरखडे, गोपाल इंगळे राहुल उमाळे , विनय मानखैर, हेमंत मानखैर डीगांबर आढाव, नामदेव मानखैर, सुरेश आवारे ,संतोष लाहूडकार, नारायण बोरवार, प्रकाश बोरवार वामनराव बोरसे, समाधान अंधारे ,भिका नांदणे ,विठ्ठल दुकाने, तेजराव गायकी , आकाश बोरसे , मनोज आवारे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
👉बॉक्स👈

संग्रामपूर तालुक्यामध्ये किसान काँग्रेसमार्फत ग्रा पं निहाय कर्ज माफी ठराव अभियान

किसान कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश मानखैर पाटील यांच्या संकल्पनेतुन तालुक्यात नागपुरात आ बच्चु कडू यांचे शेतकऱ्या साठी सुरु असलेल्या कर्ज मुक्ती आंदोलनाला पाठींबा शेत मालाला उत्पादन खर्चा प्रमाणे भाव व शासकीय खरेदी केंन्द्र त्वरित सुरु करण्यात यावे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय डबघाईत आल्याने त्यात कर्ज बाजारी शेतकऱ्यांना कर्ज माफी साठी राबविलेल्या अभियान ग्रा पं निहाय शेतकरी कर्जमाफी ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे ठराव तहसिलदार पाटील यांना देण्यात आले यावेळी शेतकरी किसान कॉग्रेस पदाधिकारी सह सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!