जळगाव जामोद येथे खरीप हंगाम 2026 करीता च्या “सत्यमेव जयते फार्मर कप साठी ” शेतकरी प्रशिक्षणास ” उस्फूर्त प्रतिसाद


बुलडाणा [प्रतिनिधी ] जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका येथे “महाराष्ट्र शासन-कृषि विभाग,पाणी फाऊंडेशन, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने व ड्रिप डिलर असोसिएशन यांच्या सहभागातून तालुका कृषि अधिकारी, जळगाव जामोद कार्यालया मार्फत “ सत्यमेव जयते फार्मर कप 2026” स्पर्धेसाठी शेतकऱ्यांचे एकदिवसीय अनिवासी प्रशिक्षण, कृषि वज्ञान केंद्र, जळगाव जामोद या ठिकाणी अतिशय उत्साहात पार पडले. सदरील प्रशिक्षणात तालुक्यातील 119 गावांतील 127 शेतकरी व कृषि विभागातील 20 अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत तालुका कृषि अधिकारी, रमेश जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना “फार्मर कप स्पर्धा 2026” संदर्भात सविस्तर माहिती देत संपूर्ण स्पर्धेची रूपरेषा सांगितली,व त्यातूनच आपण सहभाग नोंदवून “पानी फाऊंडेशन ” चळवळीच्या माध्यमातून तयार होणाऱ्या शेतकरी गटांतील शेतकऱ्यांनी स्पर्धेतील सहभागातून पुढे या निर्माण झालेल्या शेतकरी गटाच्या सक्रिय सहभागातून शेतमालासाठी भविष्यातील शेतमाल विपणन साठी “शेतकर्यांनीच शेतकऱ्यांसाठी चालविलेली बाजार व्यवस्था, म्हणजेच आदर्श बाजर व्यवस्था होय”, या एक “आदर्श बाजार व्यवस्था ” तालुक्यात निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त करून उपस्थितांना आव्हान केले. याप्रसंगी पानी फाऊंडेशन च्या टिमचे समन्वयक ब्रह्मदेव गिर्हे, सीमा उमाळे व सुभाष गवई हे प्रशिक्षक म्हणून लाभले. त्यावेळी फाऊंडेशन चे समन्वयक तथा प्रशिक्षक ब्रम्हदेव गिर्हे व सुभाष गवई यांनी फार्मर कप स्पर्धेतील टप्पे व स्वरूप,भुमिका,उद्दिष्टे यासह स्पर्धेचा मुख्य उद्देश गटशेतीला प्रोत्साहन, उत्पादन खर्च कमी करणे,सामुदायिक तंत्रज्ञानाचा वापर यांसह आरोग्यदायी स्पर्धा निर्माण करणेच महत्व विषद करून सदरील स्पर्धा हि “मे 2026 ते जानेवारी 2027” या कालावधीत पार पडणार असल्याने त्या स्पर्धेत सहभाग घेवू इच्छिणाऱ्यांना मोबाईल अॅपच्या माध्यातून नोंदणी केली. कु. उमाळे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना “पानी फाऊंडेशन फार्मर कप ” स्पर्धेतील सहभाग,प्रक्रिया, व टप्पे ईत्यादी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजेच या प्रशिक्षणास उपस्थित सर्व शेतकऱ्यांकडून कृषि विभागाचे महाविस्तार एआय अॅप डाऊनलोड करून घेत गावातील शेतकऱ्यांना सुद्धा एआय अॅप चा वापर मोठ्याप्रमाणात करण्याचे आव्हान देखील तालुका कृषि अधिकारी यांनी केले.याप्रसंगी उपस्थितांपैकी ७५ शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय एप्लीकेशन जागेवरच डाऊनलोड करून घेतलेत. यावेळी तालुक्यातील युवा, प्रयोगशिल शेतकरी, महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषि अधिकारी, शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजनाबाबत यशस्वीतेसाठी मंडळ कृषि अधिकारी कु. पाटील, अजिंक्य भटकर,उपकृषि अधिकारी सुरडकर व सर्व सहाय्यक कृषि अधिकारी यांनी परिश्रम घेतले.



