
संग्रामपूर [प्रतिनिधी ] सोयाबीन खरेदी केंद्रावर आर्द्रता जास्त ,रंग काळा खराब माल अशी कारणे देत शेतकऱ्यांचा माल परत करने थांबवा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातुन कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल वखारे पाटील यांच्या सह शेतकऱ्यांनी दिला आहे खरीप हंगाम २०२५-२६ साठी शासनाने सोयाबीनचा हमीभाव ५,३२८ रुपये प्रति क्विंटल निश्चित केला असला, तरी संग्रामपूर तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रावर अधिकारी-कर्मचारी आर्द्रता जास्त ,रंग काळा,खराब माल’अशी कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा माल स्वीकारण्यास साफ नकार देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास थांबवा कोणतेच कारण न दाखविता शेतक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा ईशारा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक विठ्ठल वखारे पाटील यांच्या सह शेतकऱ्यांनी दिला आहे तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि शेतकऱ्यांनी वेळेत रागेत उभे राहून ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून संदेश प्राप्त झाल्यानंतर माल नाफेड केंन्द्रावर मोजमाप विक्रि साठी आणले मात्र केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी आर्द्रता जास्त ,रंग काळा खराब माल अशी कारणे पुढे करून शेतकऱ्यांचा माल स्वीकारण्यास साफ नकार देत असल्याची ओरड शेतकरी वर्गातुन होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा माल पडून आहे त्यात बाजार भाव हमीभावापेक्षा खूपच कमी असल्याने कृषि प्रधान देशात शेतकऱ्याची चेष्ठा थांबवा शेतकरी संतप्त झाल्याचे वस्तुस्थिती असुन आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा अंत शासनाने पाहू नये तालुक्यातील खरेदी केंन्द्रांची स्वाता तहसिलदार यांनी जातीने पाहनी करून अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त सूचना द्यावे नाकारलेला माल पुन्हा तपासून खरेदी करणे करण्यात यावी जर त्वरित खरेदी सुरू झाली नाही तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वखारे पाटील , विशाल चोपडे,अण्णा वखारे सह नाफेड केंन्द्रांवरून सोयाबीन खरेदी न करता परत केलेल्या अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे



