संग्रामपूर तालुका पत्रकार संघ कार्यकारणी जाहीर अध्यक्ष प्रल्हाद दातार , उपाध्यक्ष सचिन पाटील तर सचिव पदि सुचित धनभर

संग्रामपुर [प्रतिनिधी ] स्वर्गीय पत्रकार केशवराव घाटे यांच्या निधना नंतर पत्रकार केशवराव घाटे प्रणित तालुका पत्रकार संघटनेची नुतन कार्यकारणी वरवट बकाल शेतकरी जिनिंगच्या सभागृहात पत्रकार बांधवांच्या उपस्थित सर्वांच्या समन्वयातुन जाहिर करण्यात आली संग्रामपुर पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदि प्रल्हाद दातार ,उपाध्यक्ष सचिन पाटील तर सचिवपदी सुचित धनभर तर उर्वरित कार्यकारणी मध्ये सललागार तथा कोषाध्यक्ष जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने , सल्लागार जेष्ठ पत्रकार काशिनाथ मानकर ,सल्लागार प्रल्हाद सावतकार सह तालुक्यातील इतर सदस्यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला पत्रकार दिनाचे औचित साधुन शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष चेतन घिवे पाटील यांनी जिल्हा युवा शिवसेनाच्या वतीने आयोजीत छोटे खानी कार्यक्रमात संग्रामपुर तालुका पत्रकार संघाचे नवनिर्वाचीत कार्यकारणीचा शाल गुलपुष्प भेट वस्तु देऊन सत्कार केला यावेळी शिवसेना युवाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते



