विशेष लेखशिक्षण

आई-वडिलांच्या चरणात सर्व तीर्थाचे सार हरिभक्त परायण नागेश महाराज आगलावे

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] ईश्वर आणि भक्ताच्या मध्ये मध्यस्थ ची गरज नाही. तुमची भक्ती मनोभावे असली पाहिजे तर ती भगवंताला सहज प्राप्त होते. भगवंताला सर्वत्र राहणे शक्य नाही म्हणून त्याने आई-वडील निर्माण केले. आई-वडिलांच्या चरणी सगळ्या तीर्थाचे सार असते असे हरिभक्त परायण नागेश महाराज आगलावे यांनी आज शिवतीर्थावर कथेचे सहावे पुष्प गुंफताना सांगितले.
महाराज आपल्या उदाहरणाला दृष्टांत देतात की, ज्याप्रमाणे गणेशाने पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालायचे सांगितले त्यावेळेस स्वतःच्या आई-वडिलांना प्रदक्षणा मारून आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली व यातूनच त्याला अग्र पूजेचा मान मिळाला. दुसरे उदाहरण आई-वडिलांची सेवा करत असताना पुंडलिक साक्षात पांडुरंगाला सुद्धा म्हणतो की तुम्ही थांबा विटेवर उभे राहा जोपर्यंत मी माझ्या आई-वडिलांचे सेवा करत आहे तोपर्यंत मी तुम्हाला भेटू शकत नाही. भगवंत आणि भक्ताचं असंच नातं असते. भक्ताच्या भेटीसाठी स्वतः पांडुरंगाला यावे लागते आणि यासाठी भक्ती तेवढी प्रामाणिक पाहिजे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी अशा ओवीतून महाराज आईच्या प्रेमाची महती सांगतात. एक आई चार मुलांना वागवते पण तिच्या म्हातारपणी चार मुलं तिला वागू शकतात का हा मोठा प्रश्न आज निर्माण होतो आहे. “चौघाची माय आणि खाटल्यावर जीव जाय “अशी आजची परिस्थिती झालेली आहे. हे बदललं पाहिजे यासाठी आपण आपला इतिहास वाचला पाहिजे. आपले पौराणिक संदर्भ तपासले पाहिजेत. देशाकडे जे प्राचीन ज्ञान आहे ते इतरत्र कोठेच नाही आज जगात जे नाते टिकून आहेत हे भारतीय संस्कृतीमुळे टिकून आहे .इतर देशात तुम्ही पहाल तर आश्चर्य वाटेल अशाप्रकारे नाते बदलतात . जिवंतपणी आई वडिलांचे महत्त्व समजून घ्या त्यांची सेवा करा आणि आपल्या जीवाचा उद्धार करून घ्या तुम्ही सेवा केली तर तुमचे मुलं तुमची सेवा करतील. हा जगाचा नियम आहे जे पेराल ते उगवत असते तुम्ही तुमच्या आई-वडिलांची सेवा कराल तेच तुम्हाला परत येईल आणि आई-वडिलांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही असेही महाराज पुढे सांगतात. ज्यावेळी गणेशाने आपली बुद्धी वापरून पृथ्वीप्रदक्षिणासाठी आपल्या आई-वडिलांना फेरी मारली त्यावेळेस भगवान कार्तिकीय नाराज होतातव निघून जातात पण त्या ठिकाणी ते एक अट ठेवतात की पौर्णिमेला आईला आणि अमावस्येला वडिलांना भेटता आलं पाहिजे यासाठी तुम्ही मला भेटायला या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही कार्तिकीय स्वामीला भेटायला शंकर आणि पार्वती ठराविक वेळेत जातात असे सांगितले जाते हे आई-वडिलांचे प्रेम आहे. आज महाराजांनी विविध दृष्टांत देऊन आई मुलाच्या नात्याला हात घातला दरम्यान बराच वेळ भावनिक वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमासाठी आता भाविक भक्तही तन-मन-धनाने पुढे आले आहे गेल्या दोन दिवसात गेल्या दोन दिवसात महाशिवरात्रीच्या प्रवासाची व्यवस्था भक्तांनी दिलेल्या छोट्या छोट्या दानातून झाली. शेवटी समितीला आज अशी जाहीर करावे लागले की उद्याच्या नियोजनाच्या मानाने मुबलक प्रमाणात उसळ मुबलक प्रमाणात उसळ तयार करण्याचे सामग्री या ठिकाणी झालेली आहे. संपूर्ण परिसरात भक्तीने वातावरण निर्माण झाले असून ठीक ठिकाणी लोक या ठिकाणी येत असल्याने कार्यकमा कथा स्थळी शामीयाना मध्ये भक्तांचा जनसागर अलोट गर्दी राहत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!