शिक्षण

संग्रामपूर स्टेट बॅक शाखेचा स्तुत्य उपक्रम जि प शाळेच्या ७५ विद्यार्थिनींना सायकली वाटप

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संग्रामपूरचे व्यवस्थापक संदेश मगरे यांच्या पुढाकाराने स्टेट बॅक शाखा मार्फत सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता 6वी च्या मुलींना दि. १२ फेब्रुवारी रोजी तहसीलदार प्रशांत पाटील , आ.डॉ.संजय कुटे यांचे बंधु बाळू कुटे , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भाऊराव पाटील, गटविकास अधिकारी माधव पायघन शाखेचे रिजनल मॅनेजर निरज कुमार, SBI HR मॅनेजर विवेक इगावे, तामगाव पोस्टेचे दुय्यम ठाणेदार राजेंद्र पवार गटशिक्षणाधिकारी दीपक टाले एसबीआय मॅनेजर किरण पाटेकर, मुख्याध्यापक योगेश कुकडे, गट समन्वयक मिलिंद सोनोने,यांच्या उपस्थितीत ७५ सायकलीचे वाटप करण्यात आले
सदर छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन संग्रामपूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते
दरम्यान स्टेट बँक शाखा संग्रामपूर यांच्या वतीने सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या व बाहेरगावावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींचा सर्वे करण्यात आला होता व त्यामधून ७५ मुली सायकलीसाठी पात्र ठरल्या
तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला छोटे खानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील हे होते शासकिय प्रशासकीय अधिकारी राजकिय पदाधिकारी यांची उपस्थिती होती संचालन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्याम कौलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन संग्रामपूर शाखा व्यवस्थापक संदेश मगरे यांनी केले वंदे मातरम व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली स्तृत्य उपक्रमामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा संग्रामपूरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!